
मनमाड (जि. नाशिक) : शहरातील शीखधर्मियांच्या गुप्तसर साहिब गुरुद्वाराबाहेर लावलेल्या एका स्टॉलवरुन २३ अवैध तलवारी, तसेच एका दुसऱ्या तरुणाकडून एक तलवार असा एकूण २४ तलवारींचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दुचाकीही जप्त करण्यात आली असून, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. (24 swords seized outside Gurdwara 2 suspects arrested in Manmad Nashik Latest Crime New)
शीख धर्मियांच्या गुप्तसर साहिब गुरुद्वाराबाहेर लावलेल्या स्टॉलवर अवैध तलवारींचा साठा असून, तो विक्रीसाठी आहे, अशी माहिती पोलिसांना मिळताच गुरुवारी (ता. ८) रात्री दहाच्या सुमारास सदर स्टॉलवर छापेमारी करण्यात आली. या छाप्यात पोलिसांना अवैधरित्या तलवारीची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले.
या वेळी संदिप बाळासाहेब पवार (रा. वडगांव पंगु, ता. चांदवड) व चरणसिंग भुपिंदरसिंग (वय २७, रा. अमृतसर) हे दोन संशयित तलवार बाळगताना व विक्री करताना आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. २४ अवैध तलवारी आणि एक दुचाकी असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदर कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, मालेगावचे अप्पर अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी समिरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, गणेश नरोटे, गौरव गांगुर्डे, राजेंद्र खैरनार आदींनी केली.
गुरुद्वारे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
एका धार्मिक स्थळाबाहेर अशाप्रकारे अवैध शस्रसाठा विक्रीसाठी कसा ठेवण्यात आला. तेथे विक्री केली जात असताना असा स्टॉल लावण्यास कोणी परवानगी दिली, यासह अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. गुरुद्वारासमोर स्टॉल लावून असा प्रकार होत असेल तर याकडे गुरुद्वारा प्रशासनाने लक्ष देणे गरजचेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.