Nashik News : ABB मध्ये 24 हजाराची पगारवाढ! मकर संक्रांतीची गोड भेट

Company management officials and Dutta Samant Praneet Association of Engineering Workers officials on salary increment agreement in ABB India Limited Company.
Company management officials and Dutta Samant Praneet Association of Engineering Workers officials on salary increment agreement in ABB India Limited Company.esakal

सातपूर (जि. नाशिक) : इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील जगातील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून ओळखली जाणारी सातपूर औद्योगिक वसाहतीमधील एबीबी इंडिया लिमिटेड कंपनीने आपल्या कामगारांना नव्या वर्षात सुमारे चोवीस हजार शंभर रूपयाची सर्वात मोठी भरघोस पगारवाढ देऊन मकर संक्रांतीची गोड भेट दिली आहे. (24 thousand salary increase in ABB sweet gift of Makar Sankranti Nashik News)

एबीबी व्यवस्थापन आणि (स्व.) दत्ता सामंत प्रणीत असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग वर्कर्स यांच्यात साडेचार वर्षांसाठी (१ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२७) झालेल्या कराराद्वारे कामगारांना मासिक वेतनात २३, ७०० अधिक प्रॉडक्शन इन्सेन्टिव्ह ४०० रुपये, अशी २४, १०० रुपयांची थेट पगारवाढ मिळणार आहे.

या व्यतिरिक्त प्रोव्हिडंड फंड व ग्रॅज्युइटी लाभदेखील मिळणार आहेत. त्याचबरोबर दिवाळी ऍडव्हान्स, गृहकर्ज, शूज, जॅकेट, शिफ्ट अलाउन्स आदी सुविधादेखील मिळणार आहेत. प्रस्थापित कराराचा ४१ दिवस कालावधी शिल्लक असतानादेखील सदर कालावधीची वेतनवाढ आगाऊ स्वरूपात देऊन व्यवस्थापनाने कामगारांना सुखद धक्का दिला.

कामगारांनी सुरक्षा, नैतिकता, अनुशासन व कार्यक्षमता यांचा अंगीकार करून कंपनीच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा उचलल्याने सदर ची पगारवाढ करण्यात आल्याचे कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश कोठावदे यांनी नमूद केले.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Company management officials and Dutta Samant Praneet Association of Engineering Workers officials on salary increment agreement in ABB India Limited Company.
Maharashtra Kesari : गतविजेत्या पृथ्वीराजला पराभवाचा धक्का! पुण्याच्या हर्षद कोकाटेचा सनसनाटी विजय

करार यशस्वी आणि खेळीमेळीच्या वातावरणात सर्व संमतीने घडवून आणण्यात युनियनतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष भूषण सामंत, सरचिटणीस संजय कोळवणकर, उपाध्यक्ष वर्गिस चाको, स्थानिक पदाधिकारी मनोज पवार, देवेंद्र पाटील, मेघराज अहिरे, हंसराज पवार, तुषार निकम, तर व्यवस्थापनातर्फे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश कोठावदे, एचआर मॅनेजर दयानंद कुलकर्णी, राहुल बढे, मनोज वाघ, रोहन घोगरे आदींनी मोलाचा सहभाग दिला.

करार स्वाक्षरी होताच सर्व कामगार सहकाऱ्यांनी फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. कार्यक्रमाचे नियोजन अतुल जाधव, महेश धार्मिक व मनोज हाडोळे आदींनी केले. सूत्रसंचालन किरण घोलप आणि रोहन सगर यांनी केले. मेघराज अहिरे यांनी आभार मानले.

कमीत कमी ८५ हजार पगाराचा दावा

कंपनीतील अनेक कामगारांच्या मुलांनाही नोकरीत सामावून घेतले असून, कोरोनाकाळात कंपनीतील निवृत्ती झालेल्या कामगार कुटुंबीयांना कंपनीत बोलावून सन्मान करत अनोखे सामाजिक बांधिलकीचे प्रदर्शन घडवले होते.

दर कराराचे वैशिष्ट्ये म्हणजे पूर्वीचा करार संपण्याच्या तब्बल चाळीस दिवस आदी नवा पगारवाढीचा करार व्यवस्थापनाने केला असून, त्यातही या ४० दिवसाचे पगारवाढीचा फरकही देण्यात येणार आहे.

करार हा निव्वळ पगारवाढ असून सीटीसी धरून हा २६, ५०० रुपयापर्यंत जाणार आहे. पगारवाढीचा करारामुळे या कंपनीतील कामगारांना आता कमीत कमी ८५ हजार ते जास्तीत- जास्त दीड लाख रुपये पगार मिळण्याचा दावा करण्यात आला आहे.

Company management officials and Dutta Samant Praneet Association of Engineering Workers officials on salary increment agreement in ABB India Limited Company.
Bamboo Movie : ‘मी तुला त्या नजरेनं पाहिलंच नाही...’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com