
विद्यार्थ्यांकडून प्राचीन वटवृक्षाला 25 फुटाची राखी
सिडको (जि. नाशिक) : शहरातील उंटवाडी पुलाजवळील सुमारे २५० वर्ष वय असलेल्या प्राचीन वटवृक्षाला राखी बांधून सुखदेव विद्यामंदिर स्काऊट गाइडच्या विद्यार्थ्यांनी वृक्षप्रेमाचा अनोखा संदेश दिला.
मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्या संकल्पनेनुसार स्काऊट गाइड शिक्षक मनिषा बोरसे, सुनील जाधव, संदीप नागरे, भारती जाधव, नंदकुमार झनकर यांनी हा उपक्रम राबविला. बालवाडी शिक्षिका सुचिता कंसारा यांनी २५ फुटाची राखी बनविली होती. या वेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची व कॅरिबॅग न वापरण्याची शपथ देण्यात आली. सरचिटणीस संजय काळे यांनी अनोख्या रक्षाबंधन उपक्रमाचे कौतुक केले. (25 feet rakhi to 250 years ancient banyan tree by scout guide students of sukhdev vidyalaya nashik Latest Marathi news)
दरम्यान, राजीवनगर येथील डे केअर सेंटर शाळेतील आनंदवन बाल मंदिरात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात वृक्ष पूजन करून करण्यात आली. मुख्याध्यापक पूनम सोनवणे आणि शाळेचे स्वच्छतादूत शिवाजी भामरे प्रमुख पाहुणे होते.
ॉ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका शेंदुर्णीकर आणि रक्षाबंधनाची माहिती शीतल धनवटे यांनी सांगितली. वृक्षाला राखी बांधून वृक्ष रक्षाबंधन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आमची शाळा, परिसर, वर्ग स्वच्छ ठेवू अशी प्रतिज्ञा घेतली.
संस्थेचे सचिव गोपाळ पाटील, अंजली पाटील, बाबासाहेब कुलकर्णी, अजय ब्रह्मेचा, माननीय अनिल भंडारी, छाया निखाडे यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. मनीषा दरेकर, शीतल वेळीस, जयश्री पवार, वर्षा पाटील, शीतल धनवटे, शीतल जोगी, सारिका शेंदुर्णीकर, सरला सूर्यवंशी, छाया सोनवणे, कविता सावळे आदींनी संयोजन केले.