NMCच्या अधिकाऱ्यांना स्वदेशी यंत्रावर भरवसा नाय; Make in India भूमिकेला हरताळ | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Latest marathi news

NMCच्या अधिकाऱ्यांना स्वदेशी यंत्रावर भरवसा नाय; Make in India भूमिकेला हरताळ

नाशिक : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नाशिक महापालिकेकडून चार यांत्रिकी झाडू खरेदी केले जाणार आहे. मात्र, नियमानुसार मेक इन इंडिया धोरणाला प्राधान्य देताना स्वदेशी यंत्र खरेदी करण्याच्या सूचना असताना महापालिकेकडून काढण्यात आलेल्या निविदेमध्ये विदेशी यंत्रांना प्राधान्य देण्यात आल्याने केंद्राच्या भूमिकेला हरताळ फासण्यात आला आहे. (NMC officials do not trust indigenous machinery Hartal to central government Make in India nashik Latest Marathi News)

पर्यावरण संवर्धनासाठी नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून ४० कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. हवा शुद्ध करण्यासाठी अनुदान वापरण्याच्या सूचना आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने चार यांत्रिकी झाडू खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

यांत्रिक झाडू खरेदी करताना स्वदेशी मालाला प्राधान्य देण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्या आहे. मात्र, घनकचरा व्यवस्थापन विभाग व यांत्रिकी विभागाने राबविलेल्या निविदा प्रक्रियेतून विदेशी बनावटीच्या यंत्रावरच प्रेम असल्याचे दिसून आले आहे. गुजरातच्या भावनगर येथे यांत्रिकी झाडू खरेदी करण्यासाठी शिष्टमंडळ गेले होते.

त्यात बनावटीच्या दुलेव्हो यंत्राची पाहणी करण्यात महापालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेत तीन निविदा धारकांनी सहभाग घेतला. त्यात दुलेव्हो मशिनसाठी आग्रह धरण्यात आल्याचे बोलले जात आहे.