Kalidas Kala Mandir : कालिदास कलामंदिरात फक्त मराठी नाटकांना 25 टक्के सवलत

Kalidas Kala Mandir
Kalidas Kala Mandiresakal

Kalidas Kala Mandir : मराठी नाटकांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेने कालिदास कलामंदिरात फक्त मराठी नाटकांसाठी २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ही सवलत राहील.

शुक्रवारी (ता. २१) झालेल्या महासभेत सदर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. (25 percent discount only on Marathi plays at Kalidas Kala Mandir nashik news)

Kalidas Kala Mandir
Chhagan Bhujbal : आरोग्य विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्ष काम लवकर सुरवात होण्याची गरज : भुजबळ

जागतिक मराठी नाट्यकर्मी निर्माता संघाचे सल्लागार प्रशांत दामले यांनी कालिदास कलामंदिरातील भाडे दरासंदर्भात निवेदन सादर केले होते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील भाडे रकमेत ७५ टक्के सवलत देण्याच्या विनंती अर्जावर कारवाई करण्याचा सूचना दिल्या होत्या.

त्या संदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. कोरोनाकाळात नाट्य व्यवसायाला मदत व्हावी तसेच चालना मिळावी म्हणून महापालिकेने ११ डिसेंबर २०२० ते ३० जून २०२२ पर्यंत दीड वर्षे ५० टक्के सवलत दिलेली होती.

१ जुलै २०२२ पासून पूर्ण भाडे आकारले जात आहे. भाडे दरात सवलत मिळण्यासाठी सादर झालेले निवेदन व कोविडमुळे मराठी नाट्य कलाकारांची हलाखीची परिस्थिती लक्षात घेता ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी म्हणून कालिदास कलमंदिरामध्ये फक्त मराठी नाटकांना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत २५ टक्के सवलत देण्यास महासभेने मंजुरी दिली आहे.

Kalidas Kala Mandir
Nashik News : स्वच्छतेत देवळा नगरपंचायत राज्यात तृतीय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com