Central Railway Megablock : मध्य रेल्वेचा या तारखेला मेगाब्लॉक; अनेक रेल्वेगाड्या रद्द

Central Railway Megablock
Central Railway Megablockesakal

Nashik News : जळगाव, पाचारोपाठोपाठ आता नांदगावही तिसऱ्या लाइनचे स्थानक बनले आहे. सध्या जळगाव-मनमाडदरम्यान तिसऱ्या लाइनचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून, या रेल्वेमार्गाच्या दृष्टीने नांदगाव येथील रेल्वे यार्डची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. (29th 30th Mega Block of Central Railway nashik news)

त्यासाठी सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत सलग चोवीस तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी काही गाड्या रद्द, तसेच अंशतः रद्द, अथवा वेगळ्या मार्गाने वळविल्या जाणार आहेत. त्यासाठीचे नियमन भुसावळच्या रेल्वे विभागाने आज घोषित केले आहे.

रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विस्ताराचा भाग म्हणून भुसावळ विभागातील जळगाव ते भुसावळदरम्यान चौथा लोहमार्ग अलीकडेच कार्यान्वित आला होता. त्यानंतर जळगाव ते मनमाडदरम्यान तिसऱ्या लोहमार्गाच्या विस्ताराचे काम प्रगतिपथावर आहे.

जळगाव ते पाचोरादरम्यान तिसऱ्या मार्गाचा पल्ला गाठल्यानंतर आता पाचारो ते नांदगावपर्यंतच तिसरा मार्ग या कामामुळे पूर्णत्वाकडे येऊ घातला आहे. सोमवारी (ता. २९) दुपारी साडेतीनपासून दुसऱ्या दिवशी (ता. ३०) दुपारी साडेतीनपर्यंत सलग चोवीस तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Central Railway Megablock
NMC News : मनपाचा कामकाजाचा गाडा खोलात रुतणार; 58 अधिकारी, कर्मचारी होणार निवृत्त

मध्य रेल्वेच्या मनमाड विभागातील नांदगाव रेल्वेस्थानकात तांत्रिक (रिमोल्डिंग)च्या कामासाठी ब्लॉक घेतल्याने २९ मे आणि ३० मेस काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत. यामध्ये ८ प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या असून, ५ प्रवासी गाड्या इतर मार्गे वळविण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिले आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

१) १११२५ भुसावळ- इगतपुरी पॅसेंजर ः ३० मेस रद्द

२) ११११९ इगतपुरी - भुसावळ पॅसेंजर गाडी ३० मेस रद्द

३) ११११४ भुसावळ - देवलाली एक्स्प्रेस २९ मेस रद्द

४) ११११३ देवलाली - भुसावळ एक्स्प्रेस ३० मेस रद्द

५) ११०२५ भुसावळ- पुणे एक्स्प्रेस, ३० मेस रद्द

६) ११०२६ पुणे - भुसावळ २९ मेस रद्द

Central Railway Megablock
Nashik Vehicle Towing: 24 तासात स्थगितीची नामुष्की! वाहनांच्या टोइंगला काही दिवसांसाठी ब्रेक

७) १२१४० नागपूर - मुंबई २९ मेस रद्द

८) १२१३९ मुंबई - नागपूर, ३० मेस रद्द

इतर मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या

१) १२७५३ नांदेड निजामुद्दीन एक्स्प्रेस ३० मेस निघणार आहे. ती अकोला-भुसावळमार्गे वळविली जाईल.

२) १२७१५ नांदेड- अमृतसर सचखंड एक्स्प्रेस ३० मेस अकोला-भुसावळमार्गे निघेल.

३) १२७१६ अमृतसर नांदेड सचखंड एक्स्प्रेस, जी अमृतसरहून २९ मेस सुटेल, ती भुसावळ कॉर्ड लाइन, अकोलामार्गे जाईल.

४) १२६१७ एर्नाकुलम निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस २८ मेस एर्नाकुलम येथून रोहा, वसई, उधना, जळगावमार्गे निघेल.

५) १२७१८ निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस २९ मेस जळगाव, उधना, वसई रोहामार्गे निजामुद्दीन सुटेल.

Central Railway Megablock
NMC News : स्मार्टसिटीकडे काम हस्तांतरित करण्याची धास्ती; जलशुद्धीकरण विस्तारीकरणास विलंब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com