Nashik News: काकड परिवाराची 3 पिढ्यांची अनोखी भाऊबीज! मखमलाबादेतील 62 भावंडांच्या निर्णयाची परिसरात चर्चा

Kakad Parivar gathered to celebrate Bhaubij
Kakad Parivar gathered to celebrate Bhaubijesakal

पंचवटी : आजकाल भाऊबंदांमध्ये जागा-जमिनी यावरून वादविवादच्या घटना घडल्याचे ऐकायला मिळत असतात. त्यामुळे कुटुंबात दुरावा तयार होतो. परिणामी, कोणीही कोणाच्या सुख-दुःखाच्या कार्यात सहभागी होत नाही.

धकाधकीच्या जीवनात कोणालाही एकत्र यायला वेळ मिळत नाही. परंतु याच गोष्टीला छेद देत मखमलाबाद गावातील महादेव बाग येथील काकड परिवाराच्या तीन पिढ्यांनी एकत्र येत अनोखी भाऊबीज साजरी करून समाजात एक आदर्श निर्माण केला. (3 generations of Kakad family unique siblings decision of 62 siblings in Makhmalabad Nashik News)

पूर्वीच्या काळात एकत्रित कुटुंब हीच प्रथा होती. त्या वेळी घरातील मोठ्या कारभाऱ्याच्या हातात घरातील आर्थिक सूत्र असायची. परंतु जसजसे कुटुंब वाढत जाऊ लागले तसतसे वेगळेपण देखील वाढत गेले.

मात्र क्वचितच एकत्रित कुटुंब पद्धती बघायला मिळत आहे. भाऊबीजेचे निमित्त साधून मखमलाबाद येथील शेतीसह विविध व्यवसायांमध्ये प्रगतिशील असलेले आणि आदर्श असलेल्या महादेव बागमधील काकड कुटुंबीयांनी तीन पिढ्यांना एकत्र आणून सर्वांची सामुदायिक भाऊबीज साजरी करून कुटुंबाचे स्नेहसंमेलन साजरे केले.

नोकरी व्यवसायानिमित्त विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले १३ भावंडे व १२ विवाहित भगिनी, तसेच जुन्या पिढीमधील सहा काका व सहा आत्या व त्यांच्या पुढील पिढीमधील २५ मुले-मुली अशा काकड परिवारातील सुमारे ६२ भावंडांनी काकड अनोखी भाऊबीज साजरी केली.

Kakad Parivar gathered to celebrate Bhaubij
Bhaubij 2023: 4 पिढीतील भाऊ-बहिणींची भाऊबीज! ब्राह्मणगावच्या अहिरे कुटुंबातील तब्बल 118 भावंडे आली एकत्र

काकड परिवाराने आयोजित केलेल्या अनोख्या भाऊबीजेचे मात्र मखमलाबाद गावातील, तसेच परिसरातील ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

"यांत्रिक युग, नोकरी व व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी असणारे भाऊ- बहिणी, व्यस्त जीवनशैली, तसेच सोशल मीडियामुळे जवळचे लांब होत चालले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीगाठी होणे दुरापास्त झाले आहे. या सर्वांना एकत्र आणून सर्वांच्या मनमोकळ्या गप्पा आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यानिमित्ताने नवीन पिढीला सर्वांशी मनमोकळे बोलता आले. यानिमित्ताने घरातील ज्येष्ठ मंडळींचे सर्वांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. दिवाळी भाऊबीजेनिमित्त या सर्वांना एकत्र आणता आल्याने एक वेगळाच आनंद मिळाला."- मदन काकड, स्थानिक, मखमलाबाद

Kakad Parivar gathered to celebrate Bhaubij
Bhaubij 2023: सैनिकाच्या बहिणीची उणीव भरली पोलिस दादाने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com