esakal | वाडीवऱ्हे जवळ भीषण अपघातात नाशिकचे तीघे जागीच ठार; २ जण गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

वाडीवऱ्हे जवळ भीषण अपघातात नाशिकचे तीघे जागीच ठार; २ जण गंभीर

sakal_logo
By
पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : वाडीवऱ्हे जवळ मुंबई - आग्रा महामार्गावरून नाशिककडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनावर नाशिककडून येणारा ट्रक डिव्हायडर तोडून जोरदार धडकल्याने भयानक अपघात झाला. या अपघातात चारचाकी वाहनातील ३ जण जागीच ठार झाल्याचे समजते. तर इतर २ जण गंभीर जखमी झाले असून जखमींची प्रकृती चिंताजनक असून पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. (3 killed on the spot in a horrific accident near Wadivarhe on mumbai - agra highway)

अपघातग्रस्त व्यक्ती मुस्लिम बांधव असून आज ईदच्या सणाच्या दिवशी काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. बुधवार (ता. २१ ) सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान झालेल्या या अपघाताची माहिती समजताच नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेच्या किमान ५ फेऱ्या झाल्या असून आणखी जखमी व्यक्ती असण्याची शक्यता आहे. अपघातात जागीच ठार झालेले ३ जण आणि चिंताजनक गंभीर जखमी व्यक्ती नाशिक शहरातील चौक मंडई येथील असल्याचे समजते. वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू आहे. पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत असून दोन्ही रस्त्यांच्या बाजूला बघ्यांची गर्दी वाढली आहे.

(3 killed on the spot in a horrific accident near Wadivarhe on mumbai - agra highway)

हेही वाचा: नाशिक : कारवर झाड कोसळून तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू!

loading image