दिलासादायक! जिल्‍ह्यात 3 हजार 182 रुग्णांची कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात

आठवड्याभरात तिसर्यांना पॉझिटिव्‍हची संख्या दोन हजारांच्‍या आत राहिली. दुसरीकडे दिवसभरात कोरोनामुक्‍त(Corona free) झालेल्‍या रुग्‍णांची संख्या तीन हजार 182 राहिली.
fight with corona
fight with coronae-sakal

नाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोना (Corona Virus) फैलावाची स्‍थिती नियंत्रणात येत असल्‍याचे आकडेवारीतून स्‍पष्ट होते आहे. शनिवारी (ता.15) जिल्‍ह्‍यात एक हजार 851 पॉझिटिव्‍ह (Covid positive) आढळले. आठवड्याभरात तिसर्यांना पॉझिटिव्‍हची संख्या दोन हजारांच्‍या आत राहिली. दुसरीकडे दिवसभरात कोरोनामुक्‍त (Corona free) झालेल्‍या रुग्‍णांची संख्या तीन हजार 182 राहिली. जिल्‍ह्‍यात तीस बाधितांच्‍या मृत्‍यूची (Covid death) नोंद आहे. (3 thousand 182 corona patients cured in nashik district)

आठवड्याभरात तिसऱ्यांदा 2 हजारापेक्षा कमी पॉझिटिव्‍ह

यापूर्वी गेल्‍या सोमवारी (ता.10) जिल्‍ह्‍यात एक हजार 835 तर काल (ता.14) एक हजार 887 बाधित आढळले होते. त्‍यातच शनिवारी (ता.15) एक हजार 851 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. शनिवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील 882, नाशिक ग्रामीणमधील 911 तर मालेगावला 58 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील एक हजार 871, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 248, मालेगावचे वीस तर जिल्‍हा बाहेरील 43 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. सायंकाळी उशीरापर्यंत तीन हजार 814 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यात नाशिक ग्रामीणमधील दोन हजार 206, नाशिक शहरातील एक हजार 339 तर मालेगावच्‍या 269 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार 810 रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 585 रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात तीन, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात पंधरा, नाशिक ग्रामीणमध्ये 180, तर मालेगावच्‍या 27 रुग्‍णांचा समावेश आहे.

fight with corona
एकेकाळी ज्या गावात कोरोनाचे थैमान; आज अख्खे 'गाव' कोरोनामुक्त!

दिवसभरात तीस बाधितांचा बळी

दिवसभरात तीस बाधितांचा कोरोनाने बळी घेतला असून, यात नाशिक शहरातील अकरा, नाशिक ग्रामीणमधील 19 मृतांचा समावशे आहे. ग्रामीणमध्ये येवला तालुक्‍यातील पाच जणांसह चांदवड व कळवण तालुक्‍यातील प्रत्‍येकी तीन बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. इगतपुरी व सिन्नर तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोन तर देवळा, पेठ आणि निफाड तालुक्‍यातील प्रत्‍येकी एका बाधिताचा कोरोनाने मृत्‍यू झाला.

ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्या वीस हजारांच्‍या आत

कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात करणार्या रुग्‍णांची संख्या सातत्‍याने अधिक राहत असल्‍याने ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या वीस हजारांच्‍या आत आली आहे. शनिवारी ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत एक हजार 361 ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात 19 हजार 126 बाधितांवर उपचार सुरु आहेत.

(3 thousand 182 corona patients cured in nashik district)

fight with corona
वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलणार? शासनाला पाठविणार फेरप्रस्‍ताव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com