एकेकाळी ज्या गावात कोरोनाचे थैमान; आज अख्खे 'गाव' कोरोनामुक्त!

corona virus test
corona virus testesakal

विंचूर (जि.नाशिक) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (corona second wave) आक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यापाड्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण (corona patient) वाढतच आहेत. बऱ्‍याच गावांमध्ये मृत्यूचे (corona death) प्रमाणही वाढले आहे, असे असताना निफाड तालुक्यातील विष्णूनगर हे गाव कोरोनामुक्त झाल्याने परिसरातून कौतुक होत आहे. असे काय केले गावाने की ते झाले कोरोनामुक्त... (vishnunangar village corona virus free)

जो रुग्ण बाधित झाला तो स्वत:हून ग्रामपंचायतीला कळवितो

विष्णूनगरला आजपर्यंत अठरा कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकही रुग्ण दगावला नाही. सध्या एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याची माहिती ग्रामसेवक कैलास जाधव यांनी दिली. विंचूर बाजार उपसमितीचे कांद्याचे ८० टक्के खळे विष्णूनगर गावालगत आहेत. त्यामुळे येथे कांद्याच्या खळ्यावर काम करणाऱ्‍या मजुरांची तसेच शेतकऱ्‍यांची नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परंतु, कोरोनाचे नियम पाळत असल्याने येथे रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. गावात जो रुग्ण बाधित झाला तो स्वत:हून ग्रामपंचायतीला कळवितो.

corona virus test
नाशिकमध्ये तिसऱ्या लाटेची तयारी : ऑक्सिजन साठा, व्यवस्थापनाकडे लक्ष केंद्रित

ग्रामस्थांची नाराजी

विष्णूनगर गावात लसीकरण व्हावे म्हणून ग्रामपंचायतीने निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे मागणी केली होती. परंतु, विंचूर येथे लसीकरण केंद्र आहे तेथे जाऊन लस घ्यावी, असे लेखी उत्तर आरोग्य केंद्राकडून देण्यात आले. त्यामुळे लसीकरणामध्ये वशिलेबाजी होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

corona virus test
चिंचोलीचे जवान अमोल झाडेंना सिक्कीमध्ये वीरगती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com