
Nashik News : इगतपुरी नगर परिषदेच्या तलावात 3 युवकांचा बुडून मृत्यु; नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
इगतपुरी शहर (जि. नाशिक) : नगर परिषद तलाव येथे फिरण्यासाठी आलेल्या दोन युवकांचा शनिवार ( ता१८ रोजी ) सकाळी १० वाजेच्या सुमारास बुडून मृत्यु झाला.
तर स्थानिक युवक या पाहुणे आलेले दोघांना वाचविण्याच्या नादात बुडाला. घटनास्थळी नगर परिषदेचे कर्मचारी, स्थानिक नागरिकांनी या तीन युवकांना बाहेर काढण्यात यश मिळाले. (3 youths drowned in Igatpuri Nagar Parishad lake agitation of relatives nashik news)
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र. तपासणीत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शाहनवाज कादिर शेख वय 41रा.इगतपुरी.( मामा ) हे रमिज अब्दुल कादीर शेख वय 36 रां भिवंडी.नदीम अब्दुल कादीर शेख वय 34 रा भिवंडी यांना वाचविण्यास गेले असता त्यांचाही मृत्यु झाला.
मृत झाल्याचे कळताच मृतांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. रुग्णालयात कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.पोलीस प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे.