अल्फ इंजिनिअरिंगचे ३० कामगार कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

workers retained

अल्फ इंजिनिअरिंगचे ३० कामगार कायम

सातपूर (नाशिक) : कोरोनाच्या भीषण परिस्थितीत औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्या बंद पडत असताना अनेक कामगारांना कामावरून कमी केले जात असल्याची भयावह स्थिती आहे. मात्र, अल्फ इंजिनिअरिंग कंपनीने संपूर्ण औद्योगिक वसाहतीत एक आदर्श उदाहरण उभे करून ३० कामगारांना कायम करत ७ हजार १०० रुपयांची भरघोस पगारवाढ केली आहे.

अल्फ इंजिनिअरिंग कंपनीने कुशल कामगारांना ७ हजार १०० रुपये तर अकुशल कामगारांना ६ हजार १०० इतकी पगार वाढ केली असून हा करार १ जून २०२० ते ३० जून २०२४ पर्यंत लागू असेल. नवीन कायम करण्यात आलेल्या ३० कामगारांना १ जून २०२० पासून ४ हजार ९७० इतकी पगार वाढ देण्यात आली आहे. आता अल्फ इंजिनिअरिंग कंपनीच्या कायम कामगारांची संख्या एकूण ३१३ झाली असून ह्या सर्व कामगारांना २१ महिन्यांचा एरियस मिळणार आहे.

दीपक घोरपडे, राजेंद्र पवार, अमोल परचाके, आत्माराम मालचे, परेश पाटील, ज्ञानेश्वर गुळवे, दिनेश भारती, विनोद सोनवणे, बापू वडितके, सोमनाथ मोरे, दिनेश लोखंडे, गुलाब पवार, गोरख उगले, मनीष सिंग, मिथिलेश सिंग, तब्रेज खान, प्रकाश गायकवाड, अनिल पाटील, प्रकाश करंदे, अर्जुन माने, दीपक जगताप, बाळू मेदगे, रविशंकर सिंग, अजय साळी, गौतम अहिरे, तुळशीराम गवळी, सुनील पवार, साहेबराव संदानशिव, संतोष शिरसाठ, दीपक पवार आदी ३० कामगार कायम करण्यात आले.

स्वाक्षरी करते वेळी युनियनच्या वतीने सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, राज्य उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार, गौतम कोंगळे, कामगार प्रतिनिधी आत्माराम डावरे, विनोद बाऊस्कर, अनिल पाटील, शरद पवार, योगेश राख, बॅरिस्टर सिंग, रवींद्र पाटील, दगडू वडगर, कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने जनरल मॅनेजर रमेश नायर, सारंग भनगे, राहुल भदाणे, अजय लोणे, दत्ता धातरंगे, स्वाती गांगुर्डे, अनिल जयस्वाल, शरद आव्हाड, अमोल मोरे हे उपस्थित होते.३१३ कामगारांना मिळणार सुविधा अशापूर्ण कुटुंबाचा ३ लाख रुपये वैद्यकीय विमा १० लाख रुपये अपघाती विमा १ वार्षिक स्नेह संमेलन मेळावा ३५ पगारी रजा व १२ सार्वजनिक सरकारी सुट्या

दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पूर्ण पगार व तीन हजार रुपये

''अल्फ इंजि.कंपनीमध्ये ३० कंत्राटी कामगारांना कायम करण्यात कामगार प्रतिनिधी व संघटनेला यश आले, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे मी सिटुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सर्व पदाधिकारी, अल्फ इंजि. कंपनीचे सीईओ पियर डिसूझा, व्यवस्थापक रमेश नायर, कंपनी व्यवस्थापन व सर्व कामगार वर्गाचे आभार मानतो.''

-आत्माराम डावरे, कामगार प्रतिनिधी, अल्फ इंजिनिअरिंग

Web Title: 30 Alf Engineering Workers Retained

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top