esakal | नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्‍यूचे सत्र सुरुच; दिवसभरात ३० बळी
sakal

बोलून बातमी शोधा

corona updates

नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्‍यूचे सत्र सुरुच; दिवसभरात ३० बळी

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक (जि. नाशिक) : जिल्‍ह्यात नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या आटोक्‍यात येत असतांना, दुसरीकडे कोरोनामुळे मृत्‍यूचे सत्र सुरुच आहे. सोमवारी (ता.17) जिल्‍ह्‍यात तीस बाधितांचा कोरोनामुळे बळी गेला. दिवसभरात एक हजार 781 पॉझिटिव्‍ह आढळले असतांना, एक हजार 723 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात 18 हजार 132 बाधितांवर उपचार सुरु आहेत.सोमवारी झालेल्‍या तीस मृत्‍यूंमध्ये नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक वीस मृतांचा समावेश आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात आठ, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील दोन बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. ग्रामीणमध्ये इगतपुरी व चांदवड तालुक्‍यात प्रत्‍येकी चार बाधितांनी कोरोनामुळे जीव गमावला. सिन्नर, येवला व मालेगाव ग्रामीणच्‍या प्रत्‍येकी तीन तर निफाड, दिंडोरी तालुक्‍यातील प्रत्‍येकी एका बाधितांचा मृतांमध्ये समावेश आहे. नाशिक महापालिका क्षेत्रालगत देवळाली कॅम्‍प परीसरातील आनंदनगरमधील मृताचा समावेश आहे.


नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये 748, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 022, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील तेरा रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. कोरोनामुक्‍त रुग्‍णांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 197 तर नाशिक ग्रामीणमधील 452 रुग्‍णांचा समावेश आहे. मालेगावच्‍या 39 तर जिल्‍हा बाहेरील 35 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली.
सायंकाळी उशीरापर्यंत दोन हजार 455 रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील एक हजार 017, नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 153 तर मालेगावच्‍या 285 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार 716 रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 500 रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात पाच, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात तेरा रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील 179, मालेगावला 19 रुग्‍ण दाखल झाले.

हेही वाचा: जन्मदात्या पित्यानेच काढला मुलाचा काटा; पित्यासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल

loading image