
नाशिक : महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक सोहळ्याला अवघे ३० टक्के कर्मचारी उपस्थित राहिल्याची बाब आयुक्तांना खटकली आहे. त्यामुळे विभागप्रमुखांना बैठकीत जाब विचारला जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादीच सादर करण्याच्या सूचना दिल्याने विभागप्रमुखांसह कार्यक्रमाचे आयोजन करणारे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (30 percent employees present at NMC Anniversary Program Absence accounting have to submit nashik news)
७ नोव्हेंबरला महापालिकेचा चाळिसावा वर्धापन दिन थाटामाटात साजरा करण्यात आला. लिमिटेड स्वरूपात कार्यक्रम असला तरी साजरा होणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करून आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका मुख्यालयावर विद्युत रोषणाई, सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले. कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून कालिदास कलामंदिरात संगीत मेजवानीचा कार्यक्रम आयोजित केला.
कार्यक्रमासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना हजर राहणे बंधनकारक करण्यात आले होते. त्याचबरोबर विभागप्रमुखांनीदेखील त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांना उपस्थित राहतील अशा पद्धतीने नियोजनाच्या सूचना दिल्या. मात्र जवळपास ९०० क्षमतेच्या कालिदास कलामंदिरात अवघे ३० टक्के कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याने संगीत मेजवानी सादर करणाऱ्यांचा हिरमोड झाला.
याशिवाय विभागीय आयुक्तांसह इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसमोरदेखील अनुपस्थितीचा बॅड शो दिसून आल्याने सदर बाब आयुक्तांना खटकली. ज्यांच्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तेच गैरहजर राहणे चुकीचे असल्याचे मत आयुक्तांनी कार्यक्रमातच व्यक्त केले. वर्धापन दिनाचा सांगता सोहळा झाल्यानंतर आता अनुपस्थितीचा लेखाजोखा आयुक्तांकडून तपासून पाहिला जात आहे. विभागप्रमुखांच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा हिशोब अधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे.
अनुपस्थितीची चर्चा अधिक
वर्धापन दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिककरांना सहभागी करून घेणे अपेक्षित होते, मात्र फक्त कर्मचाऱ्यांपुरताच कार्यक्रम मर्यादित राहिला. कालिदास कलामंदिरात यापूर्वीच्या आयुक्तांनी केलेल्या कामगिरीचा आढावा सादर करणे अपेक्षित असताना फक्त विद्यमान आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याच कामकाजाचा आढावा माजी आयुक्त व विद्यमान विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमोर सादर करण्यात आल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.
कर्मचाऱ्यांच्या नाष्टा-पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच कार्यक्रम कार्यालयीन वेळेत घेतला असता तर गर्दी जमली असती असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तर विभागप्रमुखांना कुटुंबासह हजर राहण्याच्या सूचना वेळेवर मिळाल्याने अनुपस्थितीची चर्चा झाली नसती, असे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.