चांदवड तालुक्यात 300 विद्युत खांब कोसळले

MSEDCL Workers repairing Electricity Polls
MSEDCL Workers repairing Electricity Pollsesakal

गणूर (जि. नाशिक) : चांदवड तालुक्याला गुरूवारी (ता. ९) वादळी पावसाने (Stormy Rain) झोडपले. यात महावितरणचे (MSEDCL) मोठे नुकसान झाले असून, रात्रंदिवस युद्धपातळीवर विद्युतपुरवठा (Power supply) सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता उन्मेष पाटील यांनी दिली. (300 electricity poles collapsed in Chandwad taluka Nashik Monsoon News)

वादळी पाऊस असल्याने शहरात अनेक झाडे कोसळले यातील बरीच झाडे ही विद्युत वाहिन्यांवर तसेच विद्युत खांबांवर कोसळल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीचा सर्वाधिक फटका चांदवड शहराला बसला आहे. चांदवड तालुक्यात मेन लाईन चे १०० तर एलटी लाईन चे सुमारे २०० असे एकूण ३०० विद्युत खांब नुकसानग्रस्त झाले आहेत. यामुळे विद्युतप्रवाह दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत खंडित करण्यात आला होता.

MSEDCL Workers repairing Electricity Polls
केरसाणेत विज पडून 2 बैल ठार; ऐन पावसाळ्यात आदिवासी बांधवांचे नुकसान

रात्री पावसाचा जोर ओसरताच मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र आव्हाड, उप कार्यकारी अभियंता उन्मेष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास दीडशे कर्मचारी, कंत्राटदार विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते. तालुक्यातील काही भागांत विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात यश आले असून, संपूर्णपणे वीजपुरवठा सुरळीत होण्याकरीता आणखी एक दिवस कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

MSEDCL Workers repairing Electricity Polls
तेजलने 12 वीच्या परीक्षेत मिळवला प्रथम येण्याचा बहुमान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com