Nashik News : बागलाण, मालेगाव रस्त्यांसाठी 32 कोटीचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik News

Nashik News : बागलाण, मालेगाव रस्त्यांसाठी 32 कोटीचा निधी

सटाणा : धुळे लोकसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेल्या १०५ किलोमीटर लांबीच्या रस्ते कामांना

८० कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी दिली. (32 crore fund for Baglan Malegaon roads Nashik News)

यात मालेगाव, बागलाण तालुक्यातील रस्त्यांसाठी ३२ कोटी रुपयाचा निधी मिळणार आहे.

खासदार डॉ. भामरे म्हणाले, की मतदार संघातील धुळे ग्रामीण, शिंदखेड़ा, मालेगाव व बागलाण तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यामुळे ग्रामीण भागात रस्त्यांची कामे उत्कृष्ट पद्धतीने होण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत या रस्त्यांच्या समावेश करण्यात आला.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

टॅग्स :NashikRoad Development