Nashik News: मालेगाव बाह्य मतदारसंघासाठी 34 कोटी 64 लाखांच्या निधीस मंजुरी

 Dada Bhuse
Dada Bhuseesakal
Updated on

Nashik News : राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात मालेगाव बाह्य मतदारसंघासाठी विविध भागातील रस्ते, मंडल अधिकारी व तलाठी कार्यालय, रस्त्यावर संरक्षक भिंत, गारेगाव-कजवाडे रस्त्यावर लहान पूल यांसह विविध कामांसाठी ३४ कोटी ६४ लाखांच्या निधीस पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नांतून मंजुरी मिळाली आहे.

मतदारसंघात नव्याने भरीव निधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघात विविध विकासकामांचा धडाका सुरू आहे. पाठोपाठ हा निधी मिळाल्याने दुरवस्था झालेल्या रस्त्यांची कामे सुलभ होणार आहेत. (34 Crore 64 Lakh Fund Approved for Malegaon Outer Constituency Nashik News)

मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात मालेगाव बाह्यमधील कामांसाठी भरघोस निधी देण्यात आला.

या निधीतून प्रामुख्याने मालेगाव- येसगाव- मळगाव- साकुरी (नि.) रस्ता, रस्त्याचे काँक्रिटीकरणासह सुधारणा, शालिमार हॉटेल ते चंदनपुरी रस्त्यासाठी साडेनऊ कोटी रुपये, दसाने- खडकी- टोकडे- अस्ताणे- कौळाणे- नागझरी रस्ता काँक्रिटीकरण करणे,

दसाने ते खडकी रस्ता कामासाठी दहा कोटी रुपये, लोणवाडे- दसाने- मालेगाव कॅम्प- सोयगाव- टेहेरे ते कौळाणे रस्ता काँक्रिटीकरणासह सुधारणा करणे, तसेच फुलेनगर ते वजीरखेडे या रस्ता कामासाठी साडेपाच कोटी रुपये निधी मंजूर कण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 Dada Bhuse
Nashik: ‘वाहतूक कोंडी’ सोडवण्यासाठी वॉर्डन नेमण्याचे आदेश; सार्वजनिक बांधकाम मंत्री भुसेंनी घेतली आढावा बैठक

पाच मंडळ अधिकारी व २६ तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी साडेपाच कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. रस्ता सुरक्षेसाठी भिंतीचे काम करणे, गारेगाव ते कजवाडे रस्ता सुधारणा, तसेच १३ लहान पुल व मोऱ्यांच्या बांधकामासाठी सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

या कामांमुळे दळणवळणासह ग्रामीण भागातील प्रशासकीय कार्यालयांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. श्री. भुसे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामांना मंजुरी मिळाली आहे. संबंधित विभागातील ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले.

 Dada Bhuse
Monsoon Tourism: प्रशासनाकडून पर्यटकांना खबरदारीच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com