
मनमाड : आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर मध्य रेल्वेतर्फे अमरावती- पुणे आणि बडनेरा- नाशिक दरम्यान एकूण ३६ उत्सव विशेष रेल्वेगाड्या मनमाडमार्गे धावणार आहेत.
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने अमरावती - पुणे आणि बडनेरा - नाशिक दरम्यान उत्सव विशेष मेमू ट्रेन चालवणार आहे. (36 festive trains by Railways on occasion of Diwali 2 special MEMU trains will also run nashik)
अमरावती - पुणे मेमू गाडी (०१२०९) विशेष मेमू अमरावती येथून ५ नोव्हेंबर२३ ते १९ नोव्हेंबर २३ पर्यंत दर रविवारी आणि बुधवारी १२.४० ला सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०२.४५ ला पोहोचेल.
दुसरी रेल्वेगाडी (०१२१०) विशेष मेमू पुणे येथून ६ ते २० नोव्हेंबरपर्यंत दर गुरूवार आणि सोमवारी ०६.३५ ला सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १९.५० वाजता पोहोचेल.
या गाडीला अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन, उरळी, हडपसर आणि पुणे थांबे आहेत.
बडनेरा - नाशिक मेमू (१४ अप आणि १४ डाऊन एकूण २८ फेऱ्या, गाडी क्रमांक ०१२११ विशेष मेमू बडनेरा येथून ६ ते १९ नोव्हेंबरपर्यंत दररोज ११.०५ ला सुटेल आणि नाशिक येथे त्याच दिवशी १९.४० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१२१२ विशेष मेमू नाशिक येथून ६ ते १९ नोव्हेंबरपर्यंत दररोज २१.१५ ला सुटेल आणि बडनेरा येथे दुसऱ्या दिवशी ०४. ३५ ला पोहोचेल.
ही गाडी बडनेरा, मुर्तजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड आणि नाशिक अशी धावणार आहे अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.