Dasara: येवल्यात विजयादशमीनिमित्त सामुदायिक सीमोल्लंघन! 350 वर्षांची परंपरेचे जतन, बालाजीच्या रथाचीही मिरवणूक

मागील ३५० वर्षांपासून विजयादशमीला सामुदायिक सीमोल्लंघनाच्या अनोखी परंपरा उत्सवप्रिय येवलेकरांनी जपली आहे.
Community boundary crossing on occasion of Vijayadashami Preservation of 350 years of tradition procession of Balaji chariot at yeola
Community boundary crossing on occasion of Vijayadashami Preservation of 350 years of tradition procession of Balaji chariot at yeolaesakal

येवला : शमीपूजन, बालाजीच्या रथाची पूजा, देवतांना सोने देऊन पूजा अन्‌ एकमेकांना सोने देऊन आलिंगन देत दिलेल्या शुभेच्छा. पारंपरिक पद्धतीने येथील गंगादरवाजा भागात मंगळवारी (ता. २४) हजारो येवलेकरांनी एकत्र सामुदायिक सीमोल्लंघन केले. (Community boundary crossing on occasion of Vijayadashami Preservation of 350 years of tradition procession of Balaji chariot at yeola nashik)

मागील ३५० वर्षांपासून विजयादशमीला सामुदायिक सीमोल्लंघनाच्या अनोखी परंपरा उत्सवप्रिय येवलेकरांनी जपली आहे. प्रत्येक सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा शहराने जपली आहे.

दसऱ्यालाही महाराष्ट्रात कोठेही नाही, अशा अनोख्या परंपरेतून प्रत्येक समाज आपला समूह करून सीमोल्लंघन करतात. परंपरेनुसार मंगळवारी सायंकाळी सहानंतर संबंध शहर अन्‌ आख्खा परिवार गंगादरवाजा भागात जमू लागले.

गंगावेशीतून भैरवनाथ मंदिर परिसरात नागरिक जमले होते. लेवा पाटीदार समाज येथील स्वामी मुक्तानंद-एंझोकेम विद्यालयाच्या प्रांगणात एकत्रित येऊन सीमोल्लंघन करतात. यानुसार मंगळवारी प्रत्येकाने आपल्या कुटुंबासह सीमोल्लंघन केले.

ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात प्रत्येकाणे विधिपूर्वक शमीपूजन केले. नवरात्रोत्सवात नऊ दिवस देवघरात बसवलेल्या घटात उगवलेले धान प्रत्येक व्यक्ती बरोबर घेऊन शमिला वाहिले.

या परिसरात विविध समाजबांधवांच्या सतरंज्या अंथरल्या जाऊन प्रत्येक जण आपआपसांत प्रेमपूर्वक चौकशी करून केळीचा प्रसाद वाटतो. नंतर आपापल्या घरी जाऊन सौभाग्यवतीकडून औक्षण करून घेतो.

लहान मंडळी वडीलधाऱ्या मंडळीच्या घरी जाऊन सोने (आपट्याची पाने) देत आशीर्वाद घेतले. गंगादरवाजा भागात सीमोल्लंघनासाठी जमलेल्या येवलेकरांच्या गर्दीने जणू यात्रेचे स्वरूप आले होते.

Community boundary crossing on occasion of Vijayadashami Preservation of 350 years of tradition procession of Balaji chariot at yeola
Dasara Melava 2023: "..आणि आझाद मैदान तुडुंब झाले!" शिंदे गटाचे शक्ती प्रदर्शन यशस्वी

प्रत्येकाने देवाला सोने देत या ठिकाणी सीमोल्लंघनाचा आनंद घेतला. शहरात चौकाचौकांत युवकांचे थवे उभे राहून सोने वाटत होते. ही परंपरा आजही पाळली जाते.

विविध मंदिरे, मित्र आप्तेष्टांच्या घरी जाऊन एकमेकांना सोने वाटून येवलेकरांनी दसऱ्याचा आनंद घेतला.

दसऱ्याचे खास वैशिष्ठ्य म्हणजे भगवान बालाजीचा रथ ९ दिवस वेगवेगळया वाहनावर स्वार होऊन शहरात फिरतो.

भाविक रथाला आपल्या घरी निमंत्रित करतात. दसऱ्याच्या दिवशी बालाजी घोड्यावर बसून नागरिकांसमवेत सीमोल्लंघन करतात, हे दृश्य सायंकाळी गंगादरवाजा भागात दिसले.

रथाचे सारथी व भाविकांना कानगी दिली जाते. एकादशीला अर्थात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रथ शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील नागडे गावात नेला जातो.

नदीत बालाजीला स्नान घातले जाते व नागडे ग्रामस्थ बालाजीचे दर्शन घेतात व रथ पुन्हा येवल्यात येतो. ही परंपरा जपत हजारो येवलेकरांनी गंगादरवाच्या भागात बालाजीच्या रथाची पूजा केली.

Community boundary crossing on occasion of Vijayadashami Preservation of 350 years of tradition procession of Balaji chariot at yeola
Nashik Dasara 2023: हजारो नाशिककरांच्या उपस्थितीत रावणदहन! फटाक्यांची जोरदार आतषबाजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com