Ganeshotsav 2022 : गोदावरी एक्सप्रेसमध्ये 'गोदावरीच्या राजा'ची स्थापना | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lord Ganesh established in Godavari Express

Ganeshotsav 2022 : गोदावरी एक्सप्रेसमध्ये 'गोदावरीच्या राजा'ची स्थापना

मनमाड (जि. नाशिक) : गणेशोत्सव हा अवघ्या महाराष्ट्राचा उत्सव. मात्र मनमाडमध्ये एक अनोखा गणेशोत्सव पाहायला मिळतो. अगदी कोणालाही खरे वाटणार नाही की लाडका गणराया रेल्वेने प्रवास करतो म्हणून, पण हे अगदी सत्य आहे.

रेल्वे गाडीचा हॉर्न वाजताच बाप्पाचा जयघोष सुरू होते. दररोज हजारो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवणाऱ्या मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेस मधील  गणेशोत्सवाची राज्यभर ख्याती आहे.

त्यामुळे रेल्वे गाडीने दहा दिवस प्रवास करणारा भारतातील एकमेव गणेश म्हणून गोदावरी राजाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. गोदावरी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वधर्मीय चाकरमान्यांनी अतिशय श्रद्धेने आज पासधारकांच्या डब्यात श्रीगणेशाची स्थापना केली. 

मनमाड रेल्वे स्थानकात सकाळपासूनच फलाट क्रमांक ४ वर रोजच्या प्रमाणे मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेस आली, मात्र आज या गाडीच्या पासधारकांच्या बोगीत काही वेगळेच वातावरण पहायला मिळाले. निमित्त होते ते या गाडीत होणा-या गोदावरी राजाच्या स्थापनेचे. गोदावरी एक्सप्रेसमधील सर्वधर्मीय चाकरमानी गेल्या २५ वर्षांपासून गुण्यागोविंदाने अतिशय श्रद्धेने पासधारकांच्या डब्यात मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेस गणेशोत्सव साजरा करतात.

यंदाही रात्री पासधारक बोगीला आर्कषक सजावट करण्यात येऊन सकाळी गाडी स्थानकात दाखल होताच अवघा स्थानक परिसर बाप्पामय होऊन गेला. गाडी सुटण्यापूर्वी मच्छिंद्र सांगळे सपत्नीं यांच्या हस्ते आरती करत प्रवासी संघटनेचा अध्यक्ष नरेंद्र खैरे यांच्यासह गोदावरी एक्सप्रेस गणेशोत्सवाचे अध्यक्ष राहुल शेजवळ, एड जावेद शेख, एड निखिल परदेशी, प्रविण नागरे, प्रविण व्यवहारे, डॉ मिटके, मंगेश घोरपडे, मुकेश निकाळे, संदीप व्यवाहरे, भुषण पवार, मच्छीद्र सांगाळे, सुरज चौधरी, शेखर थोरात, गोरख खैरे,

उमेश देसाई, धनजय आव्हड, मंगेश जगताप, संदीप आढाव, स्वप्नील म्हस्के, रवी देगले, ललित धन्दल, संतोष मुनोत, शरद राऊत, ललित आंबेकर, अशोक बिहारी, विशाल आहिरे, भुषण बुवा, सुनिल पद्मने, सचिन निंभोरकर, जावेद शैख, रोहित मूलचंदनी, निलेश शिरसाठ, बाळा पगारे, गोरख सांगळे, विशाल अव्हाड़ या टीमने गणरायाची वाजत-गाजत उत्साहात स्थापना करून दररोजचा प्रवास सुखाचा होण्याची कामना केली.

हेही वाचा: भाजप-मनसेची युती झाली तर आश्चर्य नको : एकनाथ खडसे

हेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

गणेशाची ही सुंदर मूर्ती येणा-या-जाणा-या प्रत्येक प्रवाशाची नजर वेधून घेत होती. गाडीची वेळ होताच गाडी मार्गस्थ होते आणि चाकरमान्यांसह आपल्या लाडक्या बाप्पाचा दहा दिवसासाठी दररोज प्रवास निर्विघ्नपणे सुरु होतो प्रत्येक स्टेशनवर चढणारा प्रवासी गणपती बाप्पाचे दर्शन घेतो आणि आमचा प्रवास सुखरुप होऊ दे, प्रवासात कुठलेही विघ्न येऊ देऊ नको अशी प्रार्थना करीत प्रवास करतो. मनमाडपासून ते कल्याणपर्यंत या गाडीने अनेक प्रवासी चाकरमाने रोज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रोजगारासाठी येतात.

सणाच्या दिवशीही सुट्टी नसलेल्यांची संख्या बरीच मोठी आहे. त्यांनाही गणेशोत्सवाचा आनंद मिळावा म्हणून पासधारकांच्या बोगीत हा गणपती बसवण्याची प्रथा सुरू झाली. मनमाडला गाडी सुटल्यावर आणि संध्याकाळी परतीच्या प्रवासात नाशिकला आरती करण्यात येते. रस्त्यावरील प्रत्येक रेल्वे स्थानकावर बाप्पांच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी भाविकांची झुंबड उडालेली असते. विशेष म्हणजे गोदावरी एक्सप्रेसमध्ये केवळ गणेशोत्सव साजरा केला जात नाही, तर या काळात सामाज प्रबोधनाचा संदेशही दिला जातो.

या वर्षी प्रवाशांनी घ्यावयाची काळजी, रेल्वे बाबत असलेले नियम, विजेची बचतीवर जनजागृती करणारे पोस्टर गाडीत लावण्यात आले आहेत. या आगळ्या - वेगळ्या गणेशोत्सवाची राज्यभर ख्याती आहे दररोज प्रवास ५०० किलो मीटर अंतराचा प्रवास करणारे प्रवाशी एरव्ही आपापल्या कामात व्यस्त असतात मात्र गणेशोत्सवाचे हे दहा दिवस सर्वधर्मीय नोकरदार , प्रवाशी एकत्र येवून गणेशोत्सव साजरा करून राष्ट्रीय एकात्मतेचे अनोखे दर्शन घडवीत असतात यामुळे गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सवाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Nashik : गणेशोत्सवासाठी 5 हजार जवान तैनात

Web Title: Ganeshotsav 2022 Installation Of Godavaricha Raja In Godavari Express Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..