3778 children in district have been deprived of child care subsidy nashik news
3778 children in district have been deprived of child care subsidy nashik news

Nashik News: बालसंगोपनाचे अनुदान लटकले! जिल्ह्यातील 3 हजार 778 बालके 7 महिन्यांपासून वंचित

Nashik News: अनाथ, बेघर बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे, तसेच या मुलांना पर्यायी कुटुंब उपलब्ध व्हावे, यासाठी बालसंगोपन योजनेच्या अनुदानात प्रतिमहिना पालकांस दोन हजार २५०, तर संस्थेस दोन हजार ५०० रुपये एवढी वाढ शासनाने केली.

अनुदानात वाढ केली असली, तरी मेपासून योजनेचे अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तीन हजार ७७८ बालके सात महिन्यांपासून अनुदानापासून वंचित आहेत. (3778 children in district have been deprived of child care subsidy nashik news)

दरम्यान, एप्रिलचे ८५ लाख रुपयांचे अनुदान नुकतेच प्राप्त झाले असून, ते लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ नुसार अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या ० ते १८ वयोगटातील मुला-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे या उद्देशाने बालसंगोपन योजना सुरू करण्यात आली.

कोविड १९ संसर्गामुळे पालक (आई-वडील) गमावलेल्या बालकांचा अर्थसहाय्य देणाऱ्या या योजनेत समावेश करण्यात आला. सरकारच्या घोषणेनुसार दोन्ही पालक (आई-वडील) गमावलेल्या मुलांच्या नावे पाच लाख रुपये मुदतठेव म्हणून जमा असेल, तर एक पालक गमावलेल्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ दिला जातो. बालसंगोपन योजनेत प्रति बालक दरमहा एक हजार १०० रुपये सहाय्य अनुदान मिळायचे.

मात्र, हे अनुदान पुरसे नसल्याकारणाने फेब्रुवारी २०२३ मध्ये वाढ करीत प्रतिमहिना आता दोन हजार २५०, तर संस्थेला प्रतिमहिना प्रति बालकास दोन हजार ५०० मिळतात.

3778 children in district have been deprived of child care subsidy nashik news
Nashik News: अक्राळेत साकारणार इंडियन ऑईलचा प्रकल्प; नाशिकच्या औद्योगिक विश्वात भर, रोजगाराच्या संधी

शासनाने ३० मे २०२३ ला योजनेचे नाव बदलून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असे केले आहे. योजनेचे नाव बदलून अनुदानात वाढ झालेली असली, तरी प्रत्यक्ष बालक अनुदानापासून वंचित असल्याचे चित्र आहे.

मे ते नोव्हेंबर २०२३ या सात महिन्यांचे अनुदान अद्याप शासनाकडून प्राप्त झालेले नाही. एप्रिल २०२३ या महिन्याचे तीन हजार ७७८ बालकांचे ८५ लाख ५०० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. रखडलेले अनुदान लवकर प्राप्त व्हावे, अशी मागणी लाभार्थी बालकांकडून होऊ लागली आहे.

आकडे बोलतात...

तालुकानिहाय लाभार्थी बालके

चांदवड (१७६), देवळा (९६), दिंडोरी (१९४), इगतपुरी (९४), कळवण (६२), मालेगाव (८१४), नांदगाव (१२५), निफाड (२०९), पेठ (१८), बागलाण (१८१), सिन्नर (२२८), सुरगाणा (२५), त्र्यंबकेश्वर (३९), येवला (९७), नाशिक ग्रामीण (१४२०).

3778 children in district have been deprived of child care subsidy nashik news
Nashik Winter Update: ढगाळ वातावरण 2 दिवस राहणार; मालेगावचे तापमान राज्‍यात नीचांकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com