पंचवटी- मक्याचा हिरवा चारा खाल्ल्याने तोंडाला फेस येत ५ एप्रिल ते मंगळवार (ता. २२)अखेर पंधरा दिवसांत तब्बल ३९ जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना आडगाव शिवारातील मानूर फाट्याजवळ घडली. दुधाचा व्यवसाय करणारे विद्याधर रौंदळ, इम्रान शेख व फरहान शेख यांची ही जनावरे आहेत.