NMC News : दिवाळीपूर्वी 396 नवीन घंटागाड्या रस्त्यावर

NMC Garbage truck
NMC Garbage truckesakal

नाशिक : अकरा महिन्यांपासून सातत्याने मुदतवाढ दिल्या जाणाऱ्या घंटागाडीच्या ठेक्याला अंतिम स्वरूप देताना दिवाळीपूर्वी ३९६ नवीन घंटागाड्या रस्त्यावर उतरण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. त्यासाठी सोमवारी (ता. १७) घंटागाड्यांची जीपीएस ट्रॅकिंग, फिजीबिलिटी व अन्य सुविधांची तपासणी केली जाणार आहे. (396 new garbage truck on road before Diwali Nashik NMC Latest Marathi News)

NMC Garbage truck
Dr. APJ Abdul Kalam : सकाळ पेपर वाचत विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला वाचन प्रेरणा दिवस

२०१६ मध्ये महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नगरसेवकांच्या विरोधाला न जुमानता पाच वर्षांसाठी घंटागाडीचा ठेका देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामागे दरवर्षी घंटागाडीच्या ठेका देताना होणारा भ्रष्टाचार थांबविणे व नागरिकांना कचरा संकलनाची चांगली सुविधा पुरविणे हा हेतू होता. मागील वर्षी ठेक्याची मुदत संपुष्टात आली. नवीन प्रस्ताव सादर झाल्यानंतर अनंत अडचणी निर्माण झाल्या.

सर्वप्रथम ठेक्याच्या किमतीवरून वाद निर्माण झाला. मागील ठेका १७६ कोटी रुपयांचा असताना त्यात दुप्पट वाढ करण्यात आली. ३५४ कोटींवर ठेका गेल्याने संशय व्यक्त करण्यात आला. डिझेलचे वाढलेले दर, वाहनांची वाढलेली संख्या, कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात झालेली वाढ आदी कारणे देण्यात आली. घंटागाडीचा ठेका देताना रिंग झाली. काही जुन्या ठेकेदारांनी रिंग केल्याचा आरोप झाला. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या कमी केल्याने यावरूनदेखील संशयाचे वादळ उठले.

नवीन ठेका देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना स्थायी समितीच्या सभेत जुन्या ठेकेदारांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सादर झाला. त्यानंतर काही ठेकेदारांनी गुजरात राज्यातील महापालिकांचे अनुभवाचे दाखले सादर केल्याने त्याची पडताळणी करण्याची वेळ प्रशासनावर आली. यासारख्या अनेक अडचणी वर मात करत अखेर विद्यमान आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सहा विभागात घंटागाडी सुरू करण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार आता ३९६ गाड्यांची सोमवारी फिजिबिलिटी टेस्ट, तसेच जीपीएस ट्रॅकिंग तपासणी केली जाणार आहे. अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी दिली.

NMC Garbage truck
Nashik Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग; कारचालकाला अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com