Dr. APJ Abdul Kalam : सकाळ पेपर वाचत विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला वाचन प्रेरणा दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Students and teachers collectively read the Daily Sakal newspaper

Dr. APJ Abdul Kalam : सकाळ पेपर वाचत विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला वाचन प्रेरणा दिवस

अंदरसुल (जि. नाशिक) : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जयंती निमित्त तब्बल सव्वा सहाशे विद्यार्थी व 31 शिक्षकांनी सामूहिकरीत्या शाळेच्या प्रांगणात दैनिक सकाळ वृत्तपत्राचे वाचन करून अनोख्या पद्धतीने वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा केला. (Students of andarsul celebrate Vachan prerna din unique way by reading Sakal Newspaper Nashik News)

हेही वाचा: Nashik : तब्बल 11 वर्षानंतर निवृत्त मुख्याध्यापिकेला न्याय!

याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सोनवणे यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याची सखोल माहिती देत शिक्षणात व जीवनात वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. दररोजच्या सवयीमध्ये वाचनाची ही सवय अत्यंत उपयुक्त असून त्याने नक्कीच बौद्धिक व्यायाम होत असतो, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी सकाळ वृत्तपत्र वाचण्याचा आनंद लुटला.

या कार्यक्रमासाठी जुनिअर कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, सुनील सपकाळ, सागर गाडेकर, सुनील भागवत, गोकुळ वाणी, मयूर भागवत, सचिन बोढरे, संदीप बोढरे, सौ निर्मला शिकारे, कुमारी मयुरी टेके, सौ कांचन गायकवाड, सौ सुषमा सोनवणे, सौ दिपाली सोनवणे, सौ सुवर्णा मस्के, सौ आरती जगधने, सौ पूजा वडाळकर, आरती भागवत, सौ रेणुका भागवत, संतोष जाधव, महेश मेहत्रे, जयेश व्यवहारे, शिवप्रसाद शिरसाठ आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Nashik :...अन् सजगतेने 'त्यांनी' वाचविला घोरपडीचा जीव