
स्मार्टसिटी अभियंता मारहाण प्रकरणी चौघे ताब्यात
जुने नाशिक : बुधवार पेठ देशपांडे गल्लीत स्मार्टसिटीअंतर्गत (Smart City) पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होते. या वेळी काम करणारे कनिष्ठ अभियंता स्वप्नील शिवाजी धनावरे (२८, रा. जेजुरकर मळा, टाकळी रोड) यांना स्थानिक काही जणांनी मारहाण (Assaulting) केली होते. याप्रकरणी भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. (4 arrested in SmartCity engineer assault case Nashik Crime News)
हेही वाचा: अभियांत्रिकी शाखेतील पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु
पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी श्री. धनावरे यांचा जबाब घेतला. त्यावरून शुक्रवार(ता. १) भद्रकाली पोलिस ठाण्यात संदेश देवरे, सुशांत शेलार, नंदन भास्करे, अक्षय दाते, अभ्या खाडे, अन्य एक अनोळखी अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक तपास करत असताना भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून कारवाई करत अक्षय दाते, सुशांत गोपीनाथ शेलार, संदेश गोरख देवरे, नंदन बाळू भास्करे अशा चौघांना शनिवारी (ता. २) दूध बाजार येथून ताब्यात घेण्यात आले. अभ्या खाडे आणि अन्य एक अनोळखी संशयित दोघांचा शोध पोलिस करत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा: दहावीनंतर विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल
Web Title: 4 Arrested In Smartcity Engineer Assault Case Nashik Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..