4 ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहराचे निरीक्षण; महापालिका, पोलिसांना प्रत्येकी 2 कॅमेरे : Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

During the drone camera training program, Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar, Commissioner of Police Ankush Shinde, CEO of SmartCity Company Sumant More.

Nashik News: 4 ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहराचे निरीक्षण; महापालिका, पोलिसांना प्रत्येकी 2 कॅमेरे

नाशिक : कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच पूरस्थिती निरीक्षण व आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीकडून महापालिका व पोलिसांना प्रत्येकी दोन ड्रोन कॅमेरे दिले जाणार आहे.

त्याचप्रमाणे शहरात २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती स्मार्टसिटी कंपनीकडून सोमवारी (ता. १३) देण्यात आली. (4 City monitoring through drone cameras NMC Police 2 cameras each Nashik News)

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार स्मार्टसिटी मिशन अंतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या वतीने इम्प्लिमेंटेशन ॲन्ड मेंटेनन्स ऑफ इंटिग्रेटेड सर्व्हेलन्स ॲन्ड सिटी ऑपरेशन्स प्लॅटफॉर्म फॉर इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर हा प्रकल्प राबविला जात आहे.

त्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून आपत्कालीन परिस्थितीमध्ये ड्रोन कॅमेरा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून शहरातील हालचालींवर कॅमेऱ्याचे निरीक्षण नोंदविले जाईल. स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याचे प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला.

महापालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचारी व पोलिसांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. ड्रोन कॅमेरा कशा पद्धतीने वापरावा, त्यासाठी कुठले सॉफ्टवेअर अस्तित्वात आहे. दोन ड्रोन कॅमेरे वापरताना कशी काळजी घ्यावी, यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

प्रशिक्षणार्थींची परीक्षा घेऊन त्यांना परवानेदेखील दिले जाणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, स्मार्टसिटी कंपनीच्या आयटी विभागाचे महाव्यवस्थापक अनिल तडकोड, उपमहाव्यवस्थापक सुधीर गोराडे, ड्रोन कॅमेऱ्याचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

सहा आपत्ती व्यवस्थापन केंद्र

स्मार्टसिटी कंपनीकडून महापालिका व पोलिसांना प्रत्येकी दोन ड्रोन कॅमेरे दिले जाणार आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून घटनांचे अचूक मॅपिंग होईल, असा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर २०० सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसविले जाणार आहे.

महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षदेखील उभारला जाणार आहे, अशी माहिती स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिली.