esakal | मालेगावमधील चार सराईत गुन्हेगार दोन वर्षासाठी हद्दपार
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

मालेगावातील चार सराईत गुन्हेगार दोन वर्षासाठी हद्दपार

sakal_logo
By
प्रमोद सावंत


मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरात अशांतता निर्माण करणारे विविध गुन्ह्यांमधील सहभागी असलेल्या चार सराईत गुन्हेगारांना नाशिक जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी ही माहिती दिली. २३ जून २०२१ ला हद्दपारीचे आदेश पारित करण्यात आले होते. यात विविध पोलिस ठाण्यातील सराईत गुन्हेगारांच्या हद्दपारीचा प्रस्ताव अपर पोलिस अधिक्षक, मालेगाव यांच्यातर्फे प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात आला होता. प्रस्तावांची छाननी व सुनावणीनंतर चौघांना तडीपार करण्यात आले.

हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये प्रदिप ऊर्फ जांग्या बापू सूर्यवशी, देवा दादाजी मेहंदळे (दोघे रा. टेहरे, ता. मालेगाव), मोहमद अतहर मोहमद अकील (मुस्लिम नगर), मोहमद मुर्तुझा अब्दुल रशिद (कमालपुरा) अशा चौघांचा समावेश आहे. टेहरे येथील दोघे छावणी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील तर उर्वरित दोघे शहर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील आहेत. छावणी पोलिस हद्दीतील प्रदिप व देवा यांना नाशिक जिल्हयासह सरहद्दीवर असलेल्या धुळे, अहमदनगर व औरंगाबाद या जिल्हयातून दोन वर्षे, तर मोहमद मुर्तुझा याला नाशिकसह सरहद्दीवर असलेल्या धुळे, जळगाव, नंदुरबार, व अहमदनगर या चार जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे. मोहमंद अतहरला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. (4 convicts in Malegaon were deported for two years)

हेही वाचा: मालेगाव तालुक्यात ८२ हजार हेक्टरवर खरीपाचे उद्दीष्ट

loading image