esakal | मालेगाव तालुक्यात ८२ हजार हेक्टरवर खरीपाचे उद्दीष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Sowing

मालेगाव तालुक्यात ८२ हजार हेक्टरवर खरीपाचे उद्दीष्ट

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यात या वर्षी खरीपाचे ८२ हजार १९३ हेक्टर पेरणीचे उद्दीष्ट आहे. पाऊस लांबल्याने जून अखेरपर्यंत फक्त १५ हजार ६८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. या वर्षीदेखील बाजरी व मका या दोन्ही प्रमुख पिकांच्या पेरणीचे उद्दीष्ट आहे. त्याचबरोबर कपाशी लागवड केली जाणार आहे.


माळमाथ्यावर दोन ते तीन पाऊस झाल्याने कपाशी लागवडीचे काम ७० टक्क्यापेक्षा अधिक पुर्ण झाले आहे. मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३३ हजार ५४९ असून आतापर्यंत २ हजार ३६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र २३ हजार ९११ पैकी १ हजार १२ हेक्टरवर पेरणीचे काम पूर्ण झाले आहे. १७ हजार ७५१ हेक्टरवर कपाशी लागवडीचे उद्दीष्ट असून, आतापर्यंत १२ हजार ३४० हेक्टरवर लागवड झाली आहे. याखेरीज ज्वारी २२० पैकी ५१, तूर ७८९ पैकी ३६, मूग ३ हजार ३८८ पैकी ११७, उडीद २५६ पैकी २५, भुईमूग १ हजार १५४ पैकी ५२, सोयाबीन ५२ पैकी १५ हेक्टरवर पेरणीचे काम झाले आहे. आठ दिवसांपासून तालुक्यात कोणत्याही भागात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा आहे.

(objective of kharif is cultivation on 82 thousand hectares in Malegaon taluka)

हेही वाचा: पाणीपुरवठा योजनेतून श्रेयवादाची लढाई; नागरिकांत संभ्रम

loading image
go to top