Nashik News : ट्रकने चिरडल्याने 4 वर्षीय बालक ठार; खर्जुल मळा येथील घटना

Child Death
Child Deathesakal

नाशिक रोड : दिव्यांग वडिलांच्या सायकलवरून घरी जात असलेला चारवर्षीय बालकाचा समोरून आलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकखाली चिरडून करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (ता.५) सायंकाळी पावणेचार वाजता खर्जुल मळा येथे घडली. अमित करंजीलाल धुर्वे, असे मृत बालकाचे नाव आहे. मृत अमित याच्या आईसह गर्दीतील काही नागरिकांना भोवळ आल्याने ते बेशुद्ध झाल्याचा प्रकार घडला. (4 year old boy killed after being crushed by truck Incident at Kharjul Mala Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

Child Death
Nashik Fire Accident : झोपडीसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक

अमित हा त्याच्या चुलत्याकडे गेलेला होता. सायंकाळी साडेतीन वाजता अमित यास घेण्यासाठी त्याचे वडील करंजीलाल धुर्वे गेले होते. अमितला घरी घेवुन जाण्यासाठी वडील करंजीलाल यांनी भावाची सायकल घेतली आणि लहानग्या अमितला सायकलच्या पुढील दांडीवर बसवून दोघेजण घराच्या दिशेने जात होते. वडील करंजीलाल एका पायाने दिव्यांग आहेत. खर्जुल मळ्यातील जगदंबा आर्ट्स या मूर्ती कारखान्याजवळ हे दोघे बापलेक आले असता समोरून रेल्वे मालधक्का येथून शिंदे गावाकडे सिमेंट घेवून जाणारा आयशर ट्रक आला. हा ट्रक जवळून पुढे जात असताना करंजीलाल धुर्वे यांच्या सायकलचा तोल गेल्याने सायकलचा आयशर ट्रकला धक्का लागला. त्यामुळे त्यांची सायकल ओढली गेल्याने उलट दिशेला फिरून खाली पडली.

या वेळी सायकलवर पुढील दांडीवर बसलेला अमित हा आयशर ट्रकच्या मागील चाकाखाली सापडला. त्याच्या डोके आणि शरीरावरून सिमेंट भरलेल्या आयशर ट्रकचे चाक गेल्याने अमितच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन तो जागीच गतप्राण झाला. अपघात होताच अपघातस्थळी पडलेला अमितच छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह बघून जमलेल्या गर्दीतील अनेकांना भोवळ आली. लहानग्या अमितच्या आईने घटनास्थळी दृश्य बघून आर्त टाहो फोडला व त्यादेखील बेशुद्ध झाल्या. अपघातानंतर आयशर ट्रकचालक वाहनासह फरार झाला.

Child Death
Nashik News : आजी- माजी मंत्री अन् 3 आमदार तरीही भार प्रभारीवर!; इतरही 500 वर पदे रिक्तच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com