महाराजा सयाजीरावांच्या ४० ग्रंथांचे होणार प्रकाशन | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराजा सयाजीराव

नाशिक : महाराजा सयाजीरावांच्या ४० ग्रंथांचे होणार प्रकाशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र व साहित्य खंडाचे प्रकाशन होणार आहे. या समारंभाच्या पूर्वतयारीसाठी महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने समितीचे बाबा भांड यांनी कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी संमेलन स्थळाला सोमवारी (ता. २२) भेट देऊन येथील जागेची पाहणी केली.

पुस्तक प्रदर्शन व्यवस्था, मुख्य मंडप, बाल कट्टा, कवी कट्ट्याची श्री. भांड यांनी पाहणी केली. महाराजा सयाजीराव गायकवाड ट्रस्ट यांनी सयाजीराव महाराजांच्या विषयीचे चाळीस ग्रंथ या साहित्य संमेलनात प्रसिद्ध करण्याचे निश्‍चित केले आहे. चरित्र विषयक ९० पुस्तके प्रसिद्ध होणार असून, हा एक विक्रम असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा: पुण्यात 'अनिस'ची मोठी कारवाई; काळ्या जादुच्या नावखाली झाडांना ठोकलेले खिळे, बाहुल्या हटविल्या.

यावेळी धारा भांड मालुंजकर, दिनेश पाटील (वारणानगर), डॉ. राजेंद्र नगर (सोलापूर) आदी उपस्थित होते. संमेलन अभूतपूर्व असे होईल असा विश्‍वास भांड यांनी व्यक्त केला. संमेलनाचे कार्यवाह प्रा. शंकर बोऱ्हाडे यांनी तयारीबाबत माहिती दिली. दरम्यान, महाराष्ट्र शासनातर्फे एकाच वेळी वीस हजार पृष्ठांच्या पन्नास ग्रंथांचे प्रकाशन प्रथमच होणार आहे. या पन्नास ग्रंथांत २६ ग्रंथ मराठीत, १४ ग्रंथ इंग्रजी आणि १० ग्रंथ हिंदी भाषेत आहेत. महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने समितीने गेल्या तीन वर्षात २६ हजार ६४२ पृष्ठांचे ६२ ग्रंथ केले आहेत.

loading image
go to top