MLA Saroj Ahire : सत्तेत सहभागानंतर 40 कोटींचा निधी; आमदार आहिरे यांच्या देवळाली मतदारसंघातील विकासकामांना मंजुरी
MLA Saroj Ahire : ‘साहेब’ की ‘दादा’ हा निर्णय करण्यात संभ्रमावस्थेत असलेल्या सरोज आहिरे यांनी दादांच्या गोटात जाण्याला पसंती दिली. आणि आज (ता.१७) सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनात तब्बल ४० कोटींचा निधी मंजूर झाला.
तीनच दिवसांपूर्वी आमदार आहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. (40 crore fund for MLA Ahire Deolali constituency nashik news)
यापूर्वीच्या तिन्ही अधिवेशनात आमदार आहिरे यांना अवघा दहा कोटींचाच विकास निधी मिळाला होता. मात्र यंदाच्या पावसाळी अधिवेशानाच्या पहिल्याच दिवशी चांगला निधी मिळाल्याचा दावा करीत त्यांनी दादा गटात सहभागाचा निर्णय कसा योग्य याकडे लक्ष वेधले.
मंजूर निधीत दहा कोटी आदिवासी भागातील विकास कामांसाठी आहेत. २५ कोटी हे मतदारसंघातील रस्ते, पूल, संरक्षक भिंत बांधणे तर उर्वरित ५ कोटी हे गिरणारे ग्रामीण रुग्णालयाकरिता निधी मिळाला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
"पहिल्याच दिवशी देवळाली मतदारसंघासाठी पुरवण्या मागण्यांतर्गत ४० कोटी मंजूर झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असल्याने देवळाली मतदारसंघात पुढच्या काही दिवसांमध्ये भरघोस निधी मिळण्याची शक्यता आहे. याद्वारे मोठया प्रमाणात विकासाची कामे मार्गी लागणार आहे." - सरोज आहिरे, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.