NCP Saroj Ahire : अजूनही मी कन्फ्यूजच : सरोज आहिरे

पवारसाहेब दैवत, दादांचे उपकार, मतदारांशी चर्चेअंती निर्णय
NCP Saroj Ahire
NCP Saroj Ahireesakal

NCP Saroj Ahire : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. सगळ्या आमदारांप्रमाणे मीही नेत्यांचा आदेश मानून ‘त्या’ पत्रावर स्वाक्षरी केली. मात्र जेव्हा मला वास्तव लक्षात आले, तेव्हा पक्षफुटीच्या घटनेमुळे मला मानसिक धक्का बसला असून, मी रुग्णालयात उपचार घेत आहे.

अजूनही मी कन्फ्यूज असून, मतदारांना विचारूनच माझा निर्णय जाहीर करेन, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज आहिरे यांनी दिली. (NCP Saroj Ahire statement still confused over ajit pawar sharad pawar controversy nashik political news)

सरोज आहिरे यांनी गंगापूर रोड येथील रुग्णालयात बुधवारी (ता. ५) पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, की मतदारसंघातील विकासकामांसाठी गेले होते. त्या वेळी घडलेल्या पक्षातील घटनेने मला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

आधीच मी आजारी होते, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी सवतासुभा रचून पक्षातून वेगळे होण्याची भूमिका घेतल्याचे ऐकून मला मानसिक धक्का बसला आहे. या धक्क्यातून बाहेर पडायला वेळ लागणार आहे.

मी रुग्णालयात उपचार घेत आहे. माझ्या हाताचे ऑपेरेशन आहे. त्यामुळे दोन दिवस कुणाच्या संपर्कात नव्हते. मी पवारसाहेब आणि अजित पवार यांना भेटले, त्यांच्याकडे माझी बाजू मांडली आहे.

पक्षातील फुटीचे नेमके चित्र स्पष्ट झाल्याने आता कुणाबरोबर जाणार? याविषयी श्रीमती आहिरे यांनी मानसिक धक्क्यात असल्याचे सांगत संभ्रमित अशीच भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, की मतदारसंघात गेले वर्ष निधी मिळविण्यात त्रास झाला, तो रद्दही झाला.

सत्ता नसल्याने विकासकामे करण्यात प्रचंड अडचणींचा मी सामना केला आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी अजित पवार यांच्यासोबत जायचे की विश्वासाला पात्र ठरण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत जायचे, याविषयी मी कुठल्याही निर्णयाप्रत आलेली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NCP Saroj Ahire
Ajit Pawar in EC: शरद पवारांची २०२२ मधील नेमणूक ग्राह्य धरता येणार नाही, अजितदादा गटाचा धक्कादायक दावा

त्यासाठी मी मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहे. मतदारांनी सांगितले, तर मी कामे थांबली तरी चालतील, पण पवार साहेबांबरोबर जाणार आहे.

मतदारांनी विकासकामांसाठी अजित पवार यांच्याबरोबर जा, असे सुचविल्यास मी जाईन. अधिवेशनापूर्वी मी माझी भूमिका स्पष्ट करेन, असेही त्या म्हणाल्या.

म्हणून मीही केली सही...

अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी जे पत्र दिले आहे. त्यावर सरोज आहिरे यांचीही स्वाक्षरी असल्याने त्यांविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, की विकासकामांसाठी मी गेले होते. इतर आमदार सही करीत होते, तशी मीही सही केली.

राजभवनलाही गेले. राजभवनात जाताना थोडी जाणीव झाली. पण सही केली तोपर्यत मला काहीही माहीत नव्हते. अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहेत.

त्यामुळे नेत्यांनी सांगितल्यानुसार आमदार सही करतात तशी मी केली. मी भावनिक आहे, निगरगट्ट राजकारणी नाही. साहेब आणि दादा यांच्यात चॉइस करणे माझ्यासाठी यक्षप्रश्न आहे.

NCP Saroj Ahire
Ajit Pawar NCP : अजित पवार-जयंत पाटील एकत्र येणार; उद्या होणारी 'ही' बैठक दोन्ही नेत्यांसाठी महत्त्वाची

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com