Nashik News : 13 रस्त्यांसाठी 40 कोटींच्या निविदा; पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ते

pm gram sadak yojana logo
pm gram sadak yojana logoesakal

नाशिक : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत नाशिक लोकसभा मतदारसंघातील तेरा रस्त्यांच्या कामासाठी ४० कोटींच्या कामांची निविदा आज प्रसिद्ध झाली.

खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांतून या कामांना गती मिळाली आहे. (40 crore tenders for 13 roads Roads through Pradhan Mantri Gram Sadak Yojana Nashik News)

नाशिक तालुक्यातील चार, सिन्नर तालुक्यातील तीन, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील प्रत्येकी तीन कामांचा समावेश आहे. मंजूर झालेल्या ४० कोटींमध्ये इगतपुरी तालुक्यासाठी ११ कोटी ३४ लाख, त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी नऊ कोटी ५४ लाख, नाशिक तालुक्यासाठी नऊ कोटी २८ लाख, तर सिन्नर तालुक्यासाठी आठ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याचे श्री. गोडसे यांनी सांगितले.

मतदारसंघातील सिन्नर, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी या चार तालुक्यांमधील तेरा रस्त्यांचे कामे करण्यात येणार आहे. निविदा प्रसिद्ध झालेल्या कामांमध्ये इगतपुरी तालुक्यातील वाघोबाची वाडी- पाडळी देशमुख- गरुडेश्वर-मुंडेगाव (तीन कोटी १७ लाख), नांदडगाव- सांजेगाव- पाटीलवाडी (दोन कोटी ८८ लाख), बलायदुरी- पारदेवी-‍ त्रिंगलवाडी- तळोशी (चार कोटी ७१ लाख),

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

pm gram sadak yojana logo
Bacchu Kadu : ''होय, मी गद्दारी केली पण...'' बच्चू कडूंनी केला खुलासा

नाशिक तालुक्यातील विल्होळी- बजरंगवाडी- बेलगाव ढगा (दोन कोटी एक लाख), जलालपूर- महादेवपूर- गिरणारे (एक कोटी ८३ लाख), जातेगाव- चिंचोळे- पळसे- शिंदे (दोन कोटी ९६ लाख), जाखोरी- जोगलटेंभी- ‍सिन्नर (दोन कोटी दोन लाख), त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा- सत्याचा पाडा (दोन कोटी २२ लाख), बोरपाडा ते रायते रस्ता (तीन कोटी),

मेटघर किल्ला-‍ विनायक खिंड- सापगाव- दुगारवाडी (तीन कोटी ३१ लाख), शास्त्रीनगर- वडगाव- डुबेरे- माळीवस्ती ते कृष्णनगर (दोन कोटी ९३ लाख), ब्राह्मणवाडे- वडझिरे ते एमडीआर २८ (दोन कोटी ३९ लाख), गोंदे फाटा- मुसळगाव- बारागाव पिंपरी (दोन कोटी ९४ लाख) या रस्त्यांचा समावेश आहे.

pm gram sadak yojana logo
SAKAL Exclusive : जलजीवनच्या 125 कामांना मिळेना मुहूर्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com