Bacchu Kadu : ''होय, मी गद्दारी केली पण...'' बच्चू कडूंनी केला खुलासा

Bacchu Kadu
Bacchu KaduEsakal

येवला : मला गद्दार म्हणताय? होय, मी गद्दारी केली ती केवळ दिव्यांगांसाठी. यामुळे देशातीलच नव्हे, तर जगातील पहिल्या अपंग- दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती झाली. माझी गद्दारी जनतेसोबत नसून, दीव्यांग व शेतकरी हितासाठी आहे. असे प्रतिपादन प्रहार शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले.

Bacchu Kadu
Bacchu Kadu News: मंदिर-मस्जिद अन्‌ भोग्यांपेक्षा जनतेचे प्रश्‍न सोडवा : कडू

पाटोदा येथे संघटनेतर्फे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात श्री. कडू यांच्या मातोश्री स्व. इंदिराबाई कडू यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला राज्यस्तरीय प्रहाररत्न पुरस्कार येथील माजी सभापती प्रवीण गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.

शेतकरी, सर्वसामान्य व आदिवासी बांधवांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेळाव्यात रक्तदान शिबिर, तसेच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

Bacchu Kadu
Bacchu Kadu : तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी, मग तिकडे का गेलात? शेतकऱ्यांचा आमदार बच्चू कडू यांना प्रश्‍न

सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मधमाशी पालन प्रशिक्षणाची नाव नोंदणीही या वेळी करण्यात आली. संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके, जिल्हाप्रमुख शरद शिंदे, अरुण ठाकरे, उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर, प्रवीण गायकवाड आदी प्रमुख पाहुणे होते.

तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा, अडचणी व केलेल्या आंदोलानाची माहिती दिली. दरसवाडी-डोंगरगाव कालवा, कांद्याचे भाव, पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवी याप्रश्‍नी लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी केली.

किरण चरमळ यांनी प्रहाररत्न पुरस्काराच्या स्वरूपाबद्दल माहिती दिली. अल्पसंख्यांक समाजातील अडचणी अजहर शहा यांनी मांडल्या. निंबाळकर यांनी पालखेड कालवा व दरसवाडी धरणाची माहिती देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून द्या, केवळ श्रेय घेऊ नका असे आवाहन केले.

Bacchu Kadu
Bacchu Kadu: अखेर मनातलं ओठावर; 'मुख्यमंत्री बनायचंय' बच्चू कडूंनी जाहीर सभेत बोलून दाखवली इच्छा

तालुकाप्रमुख हरिभाऊ महाजन, युवा आघाडी तालुकाप्रमुख सुनील पाचपुते, किरण चरमळ, बापूसाहेब शेलार, रामभाऊ नाईकवाडे, वसंत झांबरे, अमोल तळेकर, ज्ञानेश्‍वर वाघ, शिवनाथ ठोबरे, संजय मेंगाने, बाळासाहेब बोराडे, गणेश बोराडे, श्याम मेंगाणे, दत्तू बोरणारे, बापू बोरणारे, श्रावण बोराडे, जनार्धन गोडसे, मंगेश आढाव, दादासाहेब शेटे, समाधान शेटे, धनंजय खरोटे, गणेश कुंभकर्ण, दीपक राजगुरू, देवमन शेलार, बापू कानडे, विपुल कानडे, सुभाष कानडे, एकनाथ जाधव, किशोर भोसले, सचिन उगले, बापू शेटे, दत्तू शेटे, सोमनाथ भुसारे, साईनाथ दिवटे आदींनी संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com