नाशिक : वेळीच मदत मिळाल्याने महिलेला जीवदान मिळाले | latest nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rescue Cobra

वेळीच मदत मिळाल्याने महिलेला जीवदान मिळाले

नांदगाव (नाशिक) : मध्यरात्री झोपेत कोब्रा नागाने दंश केलेल्या महिलेवर सर्पमित्राच्या मदतीने वेळेवर उपचार मिळाले. त्यामुळे सर्वत्र सर्पमित्राच्या धाडसाचे कौतूक केले जात आहे

येथील काळे वस्तीत राहणाऱ्या वैशाली शरद काळे या महिलेस मध्यरात्री झोपेत सर्पदंश झाला. त्यांनी उठून पायाजवळ बघितले तर एक सर्प जाताना दिसला आणि पायाला त्रास जाणवू लागला. पायावर दोन दातांचे निशाण दिसताच त्यांनी पती शरद काळे यांना उठवले आणि घडला प्रकार सांगितला. श्री. काळे यांनी पुतणे सचिन काळे यांच्या माध्यमातून सर्पमित्र विजय बडोदे यांना रात्री दीडच्या सुमारास संपर्क साधला.

बडोदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कोब्रा नागाला शिताफीने पकडले. तसेच, वैशाली काळे यांना धीर दिला. त्यांच्या पायाची दंश झालेली जागा डेटॉलने स्वच्छ केली आणि नांदगाव आरोग्य केंद्रात वेळेवर दाखल करीत उपचास सुरू केले. वेळीच मदत मिळाल्याने वैशाली काळे यांना जीवदान मिळाले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. सर्पमित्र विजय बडोदे यांनी सर्पदंश होण्याचे व प्रथमोपचारावर थोडक्यात माहिती दिली.

हेही वाचा: मित्रांसोबत खेळणाऱ्या चिमुकल्याला सापाने घेतला चावा, दवाखान्यात नेताना...

"उन्हाळ्यात जमिनीवर झोपणे टाळावे. सर्पदंश झाल्यावर तांत्रिक- मांत्रिकाकडे न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावे. सर्पदंशाची जागा ब्लेडने कापू नये. डेटॉल किंवा साबणाने सदर जागा स्वच्छ धुवावी व आवळपट्टी बांधावी."
- विजय बडोदे, सर्पमित्र, नांदगाव

हेही वाचा: मित्रांसोबत खेळणाऱ्या चिमुकल्याला सापाने घेतला चावा, दवाखान्यात नेताना...

Web Title: Snake Bite A Women At Midnight Nandgaon Taluka In Nashik District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikwomenCobrasnake
go to top