esakal | बाजारपेठा बंद असतानाही ४ हजार नाशिककरांचा बसने प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

Citilink nashik bus service

बाजारपेठा बंद असतानाही ४ हजार नाशिककरांचा बसने प्रवास

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनामुळे (Corona virus) शनिवार व रविवार, असे दोन दिवस शहरातील व्यवहार बंद असतानाही नव्याने सुरू झालेल्या शहर बस वाहतुकीतून चार हजार २५६ नागरिकांनी प्रवास केला. त्यातून संध्याकाळी सातपर्यंत ९४ हजार रुपये उत्पन्न प्राप्त झाले. नऊ मार्गांवर २७ बस धावल्या. (4000-Nashik-residents travel-by-bus-on-weekend-lockdown-marathi-news)

गर्दी वाढल्यास बसची संख्या वाढवणार

महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक बससेवेला नऊ जुलैपासून सुरवात झाली. आज दुसऱ्या दिवशी तपोवन व नाशिक रोड डेपोतून नऊ मार्गावर २७ बस सोडण्यात आल्या. तपोवन ते बारदान फाटा, तपोवन ते सिम्बायोसिस कॉलेज, तपोवन ते पाथर्डी गाव, सिम्बायोसिस कॉलेज ते बोरगड, तपोवन ते भगूर, नाशिक रोड ते बारदान फाटा, नाशिक रोड ते अंबड गाव, नाशिक रोड ते निमाणी, नाशिक रोड ते तपोवन या मार्गांवर सकाळी ४. ३५ वाजेपासून बससेवा सुरू करण्यात आली. संध्याकाळी सातपर्यंत कंट्रोल रूमला प्राप्त झालेल्या माहितीनुसार ४, २५६ प्रवाशांनी प्रवास केला. नाशिक रोड डेपोतून १४६, तर तपोवन डेपोतून २०१ फेऱ्या झाल्या. शनिवार व रविवार, या दोन दिवशी कोरोनामुळे शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. शनिवारी औद्योगिक वसाहत पूर्णपणे बंद असते. असे असतानाही पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारीदेखील याचप्रमाणे परिस्थिती राहील. सोमवारपासून बाजारपेठ पूर्ववत झाल्यानंतर प्रवासी पुन्हा वाढतील. सोमवारपासून गर्दी वाढल्यास बसची संख्यादेखील वाढविली जाणार असल्याचे सिटीलिंक कंपनीचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितले.

(4000-Nashik-residents travel-by-bus-on-weekend-lockdown-marathi-news)

हेही वाचा: पाणी टंचाई नको तर पाउस आणा; पालकमंत्र्यांचा भाजपला सल्ला

हेही वाचा: येवल्यात कोरोना रुग्णसंख्या थांबता थांबेना!

loading image