esakal | ''पाणी टंचाई नको तर पाउस आणा!" पालकमंत्र्यांचा सत्ताधारी भाजपला सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal

पाणी टंचाई नको तर पाउस आणा; पालकमंत्र्यांचा भाजपला सल्ला

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : यंदा पावसाची स्थिती चांगली नाही. जेमतेम २७ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. धरणात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे महापालिकेला उपलब्धता पाहून काटकसरीने पाणी वापर करावा लागणार आहे. आमच्या सत्ता काळात पाणी कपात नको. अशी भूमिका कुणाला घेता येणार नाही. जर घ्यायची असेल तर मग पाउस आणा. असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला दिला. (Chhagan-Bhujabal-said-about-water-cut-off-in-nashik-marathi-news)

पाणी उपलब्ध न झाल्यास जबाबदारी कुणाची?

शुक्रवारी कोरोना साप्ताहीक आढावा बैठकीनंतर शहरातील पाणीप्रश्नाबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले. शहरातील पाणीटंचाई बाबत सत्ताधारी गंभीर नाही. जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र दिल्यानंतरही महापालिकेने शहरात पाणी कपात सुरु केलेली नाही. त्याविषयी श्री भुजबळ म्हणाले की, ''सत्तेचा आणि पाणीटंचाईचा काय संबध! तुमच्या कारकिर्दीत पाणीटंचाई करायची नसेल तर मग पाउस आणा'', असा सल्ला देतांना महापालिका आयुक्तांना पाण्याची स्थिती पाहून कपातीचा निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा टंचाईमुळे पाणी उपलब्ध न झाल्यास त्याची जबाबदारी कुणावर द्यायची ? असा प्रश्न केला.

हेही वाचा: यूपीएससी परिक्षार्थीनी नाशिक केंद्र निवडावे : हेमंत गोडसे

आढावा घेउन निर्णय

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनीही, शहरातील पाणी कपातीबाबत पुढील आठवड्यात आढावा घेतला जाणार आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत शहरासाठी पाणी पुरेल अशी स्थिती आहे. पुढील आठवड्यात पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेउन कपातीचा निर्णय घेतला जाईल. असे स्पष्ट केले.

(Chhagan-Bhujabal-said-about-water-cut-off-in-nashik-marathi-news)

हेही वाचा: सप्तशृंगगडाचा विकास आराखडा शिखर समितीच्या मान्यतेसाठी सादर

loading image