ZP Super 50 Activity: 'सुपर 50' साठी 4263 विद्यार्थ्यांची हजेरी! जिल्ह्यातील 16 केंद्रावर पार पडली परीक्षा

Students appearing for the examination at the center at Sinnar.
Students appearing for the examination at the center at Sinnar.esakal

ZP Super 50 Activity : जिल्ह्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीसह 'जेईई', 'नीट'चे मोफत शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या 'सुपर ५०' या उपक्रमांतर्गत रविवारी (ता.१६) घेण्यात आलेल्या निवड चाचणी परीक्षेस ४२६३ विद्यार्थ्यांनी (८१.१८ टक्के)हजेरी लावली.

जिल्ह्यातील १६ ठिकाणी विविध केंद्रांवर ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली. अर्ज करूनही ९८८ विद्यार्थी या परीक्षेस गैरहजर राहिले. (4263 students attend for ZP Super 50 Activity examination conducted at 16 centers in district nashik)

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी हा महत्वकांक्षी प्रकल्प गतवर्षी सुरु केला. प्रारंभी अनुसूचित जाती व जमातीच्या ५० विद्यार्थ्यांनासाठी ही योजना लागू होती.

यात पालकमंत्री दादा भुसे यांनी निधीची तरतूद करून सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांचाही समावेश केला. त्यामुळे एकूण ११० विद्यार्थ्यांना अकरावी व बारावी शिक्षणासह 'जेईई' व 'नीट' या प्रवेश परीक्षांचे मोफत मार्गदर्शन केले जाते.

शैक्षणिक वर्ष २०२३:२४ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी जिल्ह्यातील १६ केंद्रांवर रविवारी परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील तालुकानिहाय १५ परीक्षा केंद्रांसह नाशिक शहरातील सीबीएस येथील डी. डी. बिटको बॉईज हायस्कूल येथे सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान परीक्षा पार पडली.

परीक्षेसाठी ५२५१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी २८२ विद्यार्थी हे ऐनवेळी परीक्षेस हजर राहिले. या परीक्षेचा निकाल येत्या १५ दिवसांत जाहीर होण्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Students appearing for the examination at the center at Sinnar.
Foreign Education : सूक्ष्म वाचनातून करा सराव

अशी पार पडली परीक्षा

बहुपर्यायी स्वरूपाचे शंभर प्रश्न सोडवण्यासाठी दीड तासांचा अवधी देण्यात आला होता. यात ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात फक्त 'जेईई' परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्यांना 'बायोलॉजी' या विषयाचे २५ प्रश्न सोडविण्याची आवश्यकता नव्हती.

ज्यांना फक्त 'नीट'चा अभ्यास करायचा आहे, त्यांनी गणिताचे २५ प्रश्न सोडविण्याची आवश्यकता नसल्याची सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली होती.

एकूण १२५ गुणांसाठी १२५ प्रश्न या प्रश्नपत्रिकेत समाविष्ट करण्यात आले होते. ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही ग्रुपचा अभ्यास करायचा आहे, त्यांना संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक होते.

Students appearing for the examination at the center at Sinnar.
Nashik: देशात वैद्यकीय प्रवेश सुरू, राज्‍यात कधी? NEET होऊनही प्रवेशाची चिन्हे नसल्याने विद्यार्थी हवालदिल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com