नाशिक | ५१५ गावांमध्ये धावताहेत ४४२ टँकर,पाण्यासाठी वणवण कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 पाण्याचे टँकर

नाशिक | ५१५ गावांमध्ये धावताहेत ४४२ टँकर,पाण्यासाठी वणवण कायम

नाशिक - मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वी राज्यातील जूनमधील सरासरी २०.८ मिलिमीटर सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत आतापर्यंत ४.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी १८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. पावसाने अद्याप मेहेरबानी केली नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या राज्यभर बिकट आहे. सिंधूदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यातील २३ जिल्ह्यांतील ५१५ गावे आणि एक हजार १८० वाड्यांसाठी ४४२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे.

पाऊस हुलकावणी देत राहिल्यास ऐन पावसाळ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत आता टँकरसंख्या भरमसाट वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षीच्या जूनच्या पहिल्या आठवड्यात ५६३ गावे आणि ९१८ वाड्यांसाठी ४१६ टँकर धावत होते. त्या वेळी धुळे, नंदुरबार, जळगाव, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत एकही टँकर सुरू नव्हता. गेल्या वर्षीचा विचार करता जून २०२१ मध्ये नागपूर जिल्ह्यातील २४ गावांसाठी १७ टँकर सुरू होते.

आता नागपूर जिल्ह्यातील तीन जिल्ह्यांसाठी तीन टँकर सुरू आहेत. जिल्हानिहाय आता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असलेल्या गावे आणि वाड्यांची व टँकरची संख्या अनुक्रमे असून (कंसात गेल्या वर्षी जिल्ह्यात सुरू असलेल्या टँकरची संख्या दर्शवते) : नाशिक-८१-१३५-७३ (५५), धुळे-१-२-१ (०), नंदुरबार-०-२-१ (०), जळगाव-८-०-७ (०), नगर- ३६-९५-२३ (२०), पुणे-५९-३०२-६६ (४१), औरंगाबाद-२-०-२ (५), (०), हिंगोली-१४-०-२० (१५), नांदेड-९-१०-१३ (२२), अमरावती-१७-०-१७ (१८), वाशीम-८-०-८ (४), बुलडाणा-२५-०-२५ (२२), यवतमाळ-२५-०-२५ (४१).

Web Title: 442 Water Tanker Running In 512 Village

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top