Market Committee Election : मालेगाव बाजार समितीसाठी 47 अर्ज दाखल; भुसे, हिरे पॅनलमध्ये सरळ लढत

Entrance of Malegaon Bazaar Committee
Entrance of Malegaon Bazaar Committeeesakal

मालेगाव (जि. नाशिक) : येथील बाजार समितीच्या १८ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. शुक्रवार (ता.३१) दिवस अखेरपर्यंत ४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात सोसायटी गटातून सर्वाधिक ३१ अर्ज दाखल झाले आहेत.

ग्रामपंचायत गटातून ९, व्यापारी गटातून ५ तर हमाल मापारी गटातून २ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सोमवारी (ता.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. (47 applications filed for Malegaon market committee election Husks diamonds straight fight in panel nashik news)

येथील बाजार समितीची १८ जागांसाठी चुरशीची निवडणूक होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या समर्थकांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे.

दोन्ही नेत्यांनी पॅनल निर्मितीची तयारी सुरु केली असून इच्छुकांची संख्या पाहता पॅनल निर्मितीसाठी नेत्यांचा कस लागणार आहे. तालुक्यावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भुसे व हिरे समर्थकांमध्ये आतापासूनच चढाओढ सुरु झाली आहे.

सोमवारी अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. ५ एप्रिलला अर्जांची छाननी होईल. वैध नामनिर्देशन पत्रांची यादी ६ एप्रिलला प्रसिद्ध होईल. ६ ते २० एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येईल.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी २१ एप्रिलला प्रसिद्ध केली जाईल. याच दिवशी चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. २८ एप्रिलला मतदान होईल. मतदान दिनांकापासून तीन दिवसांच्या आत मतमोजणी होईल.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Entrance of Malegaon Bazaar Committee
Yeola Market Committee Election : राष्ट्रवादी-शिवसेनेमुळे पॅनलचा गुंता सुटता सुटेना!

ग्रामपंचायत गटात एकूण ४ जागा असून १ हजार २३२ मतदार आहेत. सोसायटी गटातून सर्वाधिक ११ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. या गटात १ हजार ५६८ मतदार आहेत. व्यापारी गटात दोन जागा असून एकूण १ हजार १२५ मतदार आहेत. हमाल मापारी गटात १ जागा असून २६२ मतदार आहेत.

सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघातून उमेदवारी करणाऱ्या उमेदवारास तो शेतकरी व रहिवासी असल्याबद्दलचा कामगार तलाठी यांचा दाखला तसेच अद्ययावत तारखेचा गाव नमुना क्रमांक सातबारा व ८ अ चा उतारा अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.

आर्थिक दुर्बल घटक जागेसाठी उमेदवाराने तहसीलदारांचा दाखला जोडणे आवश्‍यक आहे. एका मतदार संघात जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.

"राखीव जागेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आलेली असून उमेदवारी अर्जासोबत फक्त सक्षम अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी असलेला जातीचा दाखला जोडणे बंधनकारक आहे." - जितेंद्र शेळके, निवडणूक निर्णय अधिकार

Entrance of Malegaon Bazaar Committee
Crop Damage : लासलगावला वावटळीने द्राक्ष बाग भुईसपाट; 10 लाखांचे नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com