मालेगाव- शहरात ९० टक्के रिक्षा या एलपीजी गॅसवर चालतात. येथे असंख्य पेट्रोलपंप असूनही एलपीजी पंप नसल्याने रिक्षाचालक अवैध पद्धतीने घरगुती गॅस रिक्षात भरतात. पोलिसांनी जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ पर्यंत ४८ ठिकाणी कारवाया केल्या आहेत. या कारवायांतून पोलिसांनी रिक्षा, वजनकाटे, गॅस सिलिंडर जप्त केले आहेत.