Nashik News : येवल्यात रस्ते-पुलांसाठी 49 कोटी; अर्थसंकल्पात तरतूद, भुजबळांचा पाठपुरावा

chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal

येवला (जि. नाशिक) : राज्याच्या अर्थसंकल्पात रस्ते व पुलांची विविध विकास कामे मंजूर झाली असून यासाठी ३१ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (49 crores for roads and bridges in Yeola Provision in budget followup of Bhujbals Nashik News)

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून तसेच, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चार रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

या रस्त्यांसाठी १७ कोटी ३४ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या कामांना सुरवात होणार असून मतदारसंघातील नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.

भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे विविध योजनांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मंजूर झाली आहे. यामाध्यमातून मतदारसंघात नागरिकांना विविध पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहे. राज्याच्या अर्थ अर्थसंकल्पातून विविध रस्त्यांची व पुलांची ३१ कोटी ९० विकासकामे मंजूर झाली आहे. त्यामुळे येवल्यातील रस्त्यांना झळाळी मिळणार आहे.

chhagan bhujbal
Soldier Missing : जवान गणेश गीते यांना वाचविता न आल्याची नितीनला सल

यात तालुक्यातील मातुलठाण-धामणगाव-अंदरसुल ते बोकटे रस्त्यामध्ये रुंदीकरण व डांबरीकरण करण्यासाठी १ कोटी ५० लाख, पाटोदा-सातारे-एरंडगाव-रवंदा रस्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ९० लाख,

येवला-नागडे-धामणगाव-भारम वाघाळे छ.संभाजीनगर हद्द रस्ता राज्य महामार्ग रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ५० लाख, राज्य महामार्ग ७ ते लासलगाव-सोमठाणदेश-पाटोदा-ठाणगाव-सावरगाव-धामोडे-नगरसूल-वाईबोथी-न्याहारखेडे खु.भारम ते राज्य महामार्ग रस्ता रुंदीकरणासाठी ३ कोटी

तर नाशिक-निफाड-येवला रस्ता १९६ ते २०१ या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ६ कोटी रुपये, नाशिक-निफाड-येवला-वैजापूर-छ. संभाजीनगर रस्त्यावर गोई नदीवर मोठ्या पुलाचे पुनर्बांधणी करण्यासाठी व रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ७.५० कोटी रुपये निधी असा २५ कोटी ४० लाख रुपये निधीच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.

निफाड तालुक्यातील डोंगरगाव विंचूर रस्ता प्रमुख जिल्हा मार्गामध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण व गटारीचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ५० लाख, कोळगाव ते कानळद रस्ता प्रमुख जिल्हा मार्गाची सुधारणा करण्यासाठी १ कोटी ५० लाख,

विंचूर-विठ्ठलवाडी-कोटमगाव रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करण्यासाठी १ कोटी, निमगाव वाकडा- भरवसफाटा ते देवगाव रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लाख असे एकूण ६ कोटी ५० लाखांच्या विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

chhagan bhujbal
Nashik News : कर वसुलीसाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीचा कारवाईचा बडगा! 18 नळ कनेक्शन तोडले

१७ कोटीच्या चार रस्त्यांच्या मंजुरी

भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असून विविध विकास कामे मंजूर झाली आहे. त्यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मतदारसंघातील चार रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

या चार रस्त्यांसाठी एकूण १७ कोटी ३४ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातील गोल्हेवाडी ते नगरसुल, पिंपळखुटे तिसरे तालुका हद्द या ९.२० किलोमीटर रस्त्यासाठी ५ कोटी ४६ लाख, येवला ते वडगाव बल्हे-बल्हेगाव-गोल्हेवाडी-सायगाव-न्याहारखेडा-रहाडी या ८.३७ किलोमीटर रस्त्यासाठी ५ कोटी ८० लाख निधी मंजूर झाला आहे.

तर निफाड तालुक्यातील विंचूर ते डोंगरगाव-देवगाव-ते राज्य महामार्ग ७ ते देशमाने या ५.३६ किलोमीटर रस्त्यासाठी ३ कोटी ७८ लाख, प्रमुख जिल्हा मार्ग ते शिवापूर मरळगोई खु.- मरळगोई बु. तालुका हद्द या २.८० किलोमीटर रस्त्यासाठी २ कोटी ३ लाख असा एकूण १७ कोटी ३४ लाखांच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे मतदारसंघातील २५.७५ किलोमीटर रस्त्यांना पुन्हा एकदा झळाळी प्राप्त होणार आहे.

chhagan bhujbal
Rangpanchami Festival : खबरदार, रंगाने भरलेले फुगे फेकले तर..; पोलिस उपायुक्तांचा इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com