Nashik News : गारपीटग्रस्तांना 5 कोटींचा निधी! मंत्री भुजबळांकडून येवला, निफाड तालुक्यातील नुकसान मदतीचा आढावा

मतदारसंघातील सुमारे तीन हजार शेतकऱ्यांना सुमारे पाच हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जात असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal

येवला : नोव्हेंबर २०२३ मध्ये येवला मतदारसंघातील निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त दोन हजार ५२७ बाधित शेतकऱ्यांना चार कोटी १५ लाख ७० हजार रुपये, तर येवला तालुक्यातील गारपीटग्रस्त ३७७ बाधित शेतकऱ्यांना ७८ लाख ७७ हजार रुपयांचा मदत निधी मंजूर झाला आहे.

मतदारसंघातील सुमारे तीन हजार शेतकऱ्यांना सुमारे पाच हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जात असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. (5 crore fund for hail victims Review of loss relief in Niphad taluka Yeola from Minister Bhujbal Nashik News)

मंत्री भुजबळ यांनी रविवारी (ता. १४) मतदारसंघात नोव्हेंबरमध्ये झालेल्या गारपीट अवकाळी नुकसान मदतीचा आढावा घेतला. शासनाने मंजूर केलेली रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाडच्या प्रांत हेमांगी पाटील, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, येवल्याचे नायब तहसीलदार पंकज मगर आदी उपस्थित होते.

निफाड तालुक्यातील विंचूर, देवगाव, नांदूरमध्यमेश्वर व लासलगाव मंडलात, तसेच येवला तालुक्यातील आंबेगाव, सोमठाण देश, निळखेडे व कातरणी परिसरात नोव्हेंबरमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.

Chhagan Bhujbal
Nashik: नाशिकचा GDP वाढीसाठी हवी दीड लाख कोटीची गुंतवणूक! जिल्हा प्रशासनाच्या पंचवार्षिक आराखड्यात खेळ आकड्यांचा

या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंत्री भुजबळ यांनी केली होती. अधिक मदत मिळवून देण्याबाबत शेतकऱ्यांना आश्र्वासित केले होते.

त्यानुसार जिरायत, बागायत व फळपिकांच्या प्रतिहेक्टरी निफाड तालुक्यातील विंचूर, देवगाव, नांदूरमध्यमेश्वर व लासलगाव मंडलातील ५० गावांतील एकूण २,५२७ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चार कोटी १५ लाख ७० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाली आहे.

येवला तालुक्यातील आंबेगाव, सोमठाण देश, निळखेडे व कातरणी येथील ३७७ नुकसानग्रस्त ७८ लक्ष ७७ हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Chhagan Bhujbal
Nashik Army Demonstration: बहुला रेंजवर उपस्थितांनी अनुभवला युद्धभूमीचा थरार! तोफखान्याच्या रेजिमेंटचा प्रशिक्षण सराव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com