Crime Update : संशयिताकडून 5 मोबाईल जप्त

Nashik  crime Latest News
Nashik crime Latest Newsesakal
Updated on

जुने नाशिक : दूध बाजार परिसरातील संशयिताकडून भद्रकाली गुन्हे शोध पथकाने पाच मोबाईल जप्त (Mobile Seized) केले. मोबाईल चोरीचे आहेत की दुकानदाराचे, याचा अधिक तपास पोलिस करीत आहे. (5 mobile phones seized from suspect nashik Crime Update Latest Marathi news)

Nashik  crime Latest News
विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू; कापशी गावातील घटना

भद्रकाली गुन्हे शोध पथक सोमवारी (ता. १८) सकाळी साडेआठच्या सुमारास दूध बाजार परिसरात गस्त करत होते. एक तरुण संशयितरीत्या परिसरात वावरत होता. पोलिसांना बघताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला.

गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी रमेश कोळी, संतोष शेळके, सागर निकुंभ, लक्ष्मण ठेवणे, धनंजय हासे यांनी त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. सोमनाथ कुमावत (२२, रा. पंचवटी) असे त्याने नाव सांगितले. चौकशी दरम्यान त्याच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली.

त्यात विविध कंपनीचे पाच मोबाईल आढळले. याबाबत त्याच विचारणा केली असता, त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. अधिक चौकशीसाठी त्यास पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

त्याच्याकडे पाच मोबाईल आले कुठून, मोबाईल चोरीचे आहे की अन्य कुणाचे दुकानदाराचे आहे. याबाबत पथकाकडून चौकशी सुरू आहे. यासंदर्भात भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Nashik  crime Latest News
Rain Update : जायकवाडी चौथ्या वर्षी ‘फुल्ल’ होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com