Nashik Tomato Price : महिन्याभरात टोमॅटोच्या दरामध्ये 50 टक्के घसरण

Tomato
Tomatoesakal

Nashik Tomato Price : आवक वाढल्याने टोमॅटो भाव खाली आले आहेत. अडीच हजार रुपयांना विक्री झालेली क्रेट आता सरासरी पाचशे रुपयांना विकावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. जुलै महिन्यात टोमॅटोचे भाव अडीच हजार रुपये क्रेटपर्यंत पोहोचले होते. (50 percent drop in tomato price within month nashik news)

टप्प्याटप्प्याने आवक वाढत गेली तसे दर घसरत चालले आहेत. बेंगळुरूमध्ये स्थानिक टोमॅटो बाजारात दाखल झाल्याने महाराष्ट्राकडून मागणी कमी झाली आहे. एका दिवसात साधारणत: टोमॅटोची आवक ४० हजार क्रेटदरम्यान होते. त्याला प्रतिक्रेट ५०० ते ५५० रुपये दर मिळाला. हाच दर कायम राहिला तरी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरुन निघेल.

यापेक्षा कमी झाले तर मात्र आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यास टोमॅटोचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आवक कमी होईल आणि भाव पुन्हा वाढतील, असाही अंदाज आहे. दोन आठवड्यांपूर्वी पिंपळगाव बसवंत बाजार समितीत अवघी अडीच हजार क्रेट आवक होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Tomato
Nashik Tomato Rates Fall: टोमॅटोची लाली ओसरली! 15 दिवसांच्या तुलनेत 2 हजारांनी कोसळले बाजारभाव

त्यावेळी प्रति क्रेट कमीत कमी २०० व जास्तीत जास्त २३०० रुपये दर होता. आता दिवसाला ४० हजार क्रेटपर्यंत आवक होते. तसेच जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्येही टोमॅटोची आवक वाढल्याने दरात प्रत्येक दिवशी घसरण होताना दिसून येते.

टोमॅटोचे दर वाढले तेव्हा केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. कांद्याच्या बाबतीतही हेच घडले. आता दर खाली आले आहेत मग केंद्र सरकार हस्तक्षेप करून भाव वाढवण्यासाठी प्रयत्न का करत नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Tomato
Nashik Tomato Rate : टोमॅटोचे बाजारभाव दरात घसरण; सरासरी साडेचारशे रुपयाचा भाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com