NMC N Cap Fund : ‘एन-कॅप’ अखर्चिक निधी परतीच्या मार्गावर; 50 टक्के निधी अखर्चिक

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal

Nashik News : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम ‘एन-कॅप’ अर्थात नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅमअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांसाठी प्राप्त झालेल्या ६४.१७ कोटी रुपयांच्या निधी खर्च करण्यासाठी केंद्र सरकारने तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला असला तरी प्राप्त निधीपैकी जवळपास पन्नास टक्के निधी अखर्चिक असल्याने तो निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारने हवा शुद्धीकरणासाठी घोषित केलेल्या ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम’नुसार हवा प्रदूषण रोखणे व त्या माध्यमातून २०२४ पर्यंत देशभरातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे नियोजन आहे.

योजनेत नाशिक महापालिकेचा समावेश आहे. योजनेसाठी महापालिकेला ६४.१७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. (50 percent n cap unspent funds is possibility of will be returned to government nashik news)

महापालिकेच्या वतीने ‘एन-कॅप’ अंतर्गत विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली असली तरी प्रकल्पांची अंमलबजावणी संथगतीने होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक महापालिकेला शंभर मानांकनाच्या पुढे फेकणारा बांधकाम साहित्य विल्हेवाट प्रकल्पाची घोषणा होऊन दोन वर्षे उलटले तरी अद्यापही प्रकल्पाच्या कामाला सुरवात झाली नाही.

चार यांत्रिकी झाडू अद्यापही प्राप्त झालेली नाही. पंचवटी, सिडको व नाशिक अमरधाममध्ये विद्युतदाहिनी बसविण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचा दावा केला जात आहे. शहरातील ११३ सार्वजनिक शौचालयांवर एक ते तीन वॅटचे सौरऊर्जेचे पॅनल बसविण्याच्या कामाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

शहरात १०६ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी तीनदा निविदा प्रक्रिया राबविली. प्री-बिड मिटिंगमध्ये मक्तेदारांच्या अटी-शर्तीनुसार बदल करण्यात आले आहे. तरीही प्रकल्प मार्गी लागतं नाही. त्यामुळे आता पुढील अडीच महिन्यात प्रकल्प मार्गी न लागल्यास निधी परतीची शक्यता निर्माण झाली आहे. हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी वडाळा-पाथर्डी रोडवरील गुरुगोविंदसिंग स्कूल, गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालय व पंचवटी विभागातील हिरावाडीतील नाट्यगृहाजवळ हवा गुणवत्ता नियंत्रण केंद्र उभारण्यात आले आहे.

NMC Nashik News
ZP Recruitment News : जि. प. नोकरभरतीसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा; जाणून घ्या संभाव्य वेळापत्रक

हे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. एन-कॅप अंतर्गत पन्नास इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु यापूर्वी ज्या महापालिकांना इलेक्ट्रिक बस खरेदी करायची आहे. त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहे. बसचे उत्पादन नसल्याने महापालिकेने आता ऑर्डर दिली तरी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. घंटागाडी पार्किंगच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

प्रस्तावित प्रकल्प (निधीची तरतूद कोटीत)

- विद्युतदाहिनी बसविणे.- पंचवटी (३.७०), नाशिकरोड (३.७६), सिडको (३.८३).

- बांधकाम साहित्य विल्हेवाट प्रकल्प.- (४.९०)

- चार यांत्रिकी झाडू खरेदी देखभालीसह.- (२४.९६)

- इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन- (१०)

- सुलभ शौचालये सोलर पॅनल- (१.५२)

- इंटिग्रेटेड सिग्नल- ५० लाख.

- घंटागाडी पार्किंग सीसीटीव्ही- ३० लाख.

- उद्यानातील वेस्ट कंपोस्टींग- ५० लाख.

- हवेतील विषारी घटक शोषणारी वनस्पती दुभाजकात लावणे.- ६० लाख.

- उभ्या पध्दतीच्या उद्यानांची निर्मिती.- ५० लाख.

- प्रदूषणमुक्तीसाठी जनजागृती- १० लाख.

NMC Nashik News
Anant Chaturdashi 2023 : विसर्जन मिरवणूक सकाळी अकरालाच; गणेश मंडळांना करावे लागणार 'या' सूचनांचे पालन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com