देवळाली कॅम्प- भरवीर बुद्रुक (ता. इगतपुरी) येथील शहीद लान्सनायक अण्णासाहेब झनकर यांच्या स्मारकावर आदर्श सैनिक फाउंडेशनतर्फे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी (ता. १४) सकाळी ६० फूट ध्वजस्तंभावर भव्य ५० चौरस फूट तिरंगा ध्वज फडकावण्यात आला.