53 percent water storage in Nashik district
53 percent water storage in Nashik districtesakal

उन्हाच्या तडाखा वाढला; नाशिक जिल्ह्यात 53 टक्के पाणीसाठा

नाशिक : जिल्ह्यातील धरणांत एकूण उपयुक्त धरणसाठ्याच्या ६५ हजार ६६४ दशलक्ष धनफूट क्षमतेच्या तुलनेत ३४ हजार ५८९ दशलक्ष घनफूट (५३ टक्के) साठा आहे. जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला असून, पाण्याची मागणी वाढू लागली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर समूहात मात्र ६० टक्के साठा आहे.

उन्हाच्या तडाख्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले

नाशिक शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या गंगापूर धरण समूहात ६० टक्के साठा आहे. त्यापैकी गंगापूरमध्ये दोन हजार ६३० दशलक्ष घनफूट (५५ टक्के), कश्यपी एक हजार ३१७ दशलक्ष घनफूट (९२), गौतमी-गोदावरी ५४२ दशलक्ष घनफूट (४६), तर आळंदीत ४५१ दशलक्ष घनफूट (५५ टक्के) पाणीसाठा आहे. नाशिक जिल्ह्यातून नगरसह मराठवाड्याला पाणीपुरवठा होतो. दारणा समूहातून पाणी सोडण्यात येते. दारणा धरणात चार हजार ८३९ दशलक्ष घनफूट (६८ टक्के) इतका धरणसाठा आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिले. तसेच उशिरापर्यंत चाललेल्या पावसाने धरणाची स्थिती चांगली आहे. मात्र सध्याच्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. सोबतच तडाख्यामुळे धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे.

53 percent water storage in Nashik district
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा ६३६ हेक्टरला दणका

आठवड्याला 3 टक्के

मागील आठवड्यात ५६ टक्क्यांहून अधिक साठा असलेल्या धरणात या आठवड्यात मात्र ५३ टक्के साठा आहे. आठवड्याला सरासरी तीन ते साडेतीन टक्के पाणीसाठा कमी होत आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाण्याची पातळी पुढील दोन ते अडीच महिने जपण्याचे महत्त्वाचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

प्रमुख धरणांतील साठा

धरण साठा (दलघफू) टक्के

गंगापूर ३,०९६ ५५

दारणा ४,८३९ ६८

पालखेड ५१८ ७९

करंजवण २,२७२ ४२

ओझरखेड १,३५७ ६४

चणकापूर १,४२२ ५९

गिरणा ८,९६७ ४८

53 percent water storage in Nashik district
नाशिक : पाच वर्षांच्या तुलनेत करवसुलीत आघाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com