Kamgar Kalyan Scholarship : कामगार कल्याण मंडळाच्या वतीने 564 कामगार पाल्यांना मिळाली शिष्यवृत्ती

Kamgar Kalyan Scholarship
Kamgar Kalyan Scholarshipesakal

सिन्नर (जि. नाशिक) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र सिन्नर मार्फत विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगार पाल्यांसाठी विविध योजना राबविल्या जात असतात यामध्ये त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक,एम.एस.सी.आय.टी., कुटुंबातील आजारपणासाठी अशा विविध राबवित असतात.

त्याचधर्तीवर यावर्षी ५६४ पाल्यांना शिष्यवृत्ती साठी १७लाख ३४ हजार एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.कामगार कल्याण केंद्र सिन्नर मार्फत सन २०२२ व २३ या वर्षातील सर्व कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक, एम. एस. सी. आय. टी.,आजारपणाचे सर्व अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे, अशी माहिती केंद्र प्रमुख श्री.अनिल बोरसे यांनी सकाळी बोलतांना दिली. (564 workers children got scholarship on behalf of Kamgar Kalyan Board nashik news)

कामगार पाल्यांना कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या इयत्तेनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. सिन्नर तालुक्यातील कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती साठी १७ लाख ३४ हजार , पाठ्यपुस्तक साठी ३ लाख ६४ हजार १७१, आजारपणासाठी ९ लाख १५ हजार, एम.एस.सी. आय.टी.प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी १ लाख ५४ हजार ८५० एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणा-या कामगार पाल्यांना कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ५० हजार शिष्यवृत्ती दिली जाते, ती पण शिष्यवृत्ती तालुक्यातील २ कामगार पाल्यांना लाभ देण्यात आला. तसेच कामगार साहित्य प्रकाशन साठी तालुक्यातील १ कामगार यांना १० हजार प्रोत्साहन म्हणून लाभ देण्यात आला.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Kamgar Kalyan Scholarship
Shirdi Palkhi : सिन्नर-शिर्डी मार्गावर साईभक्तांची मांदियाळी; ठिकठिकाणी भव्य स्वागत

अशा विविध योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील कामगार व कामगार पाल्यांना लाभ दिल्याबद्दल तालुक्यातील सर्व कामगार बंधूंनी केंद्र प्रमुख श्री. अनिल बोरसे यांचे कौतुक करून आभार मानले. कामगार कल्याण मंडळाकडून ३२ लाख ७८ हजार रक्कम प्राप्त झाली.

विद्यार्थ्यांच्या खात्यातवर रक्कम जमा होण्यास प्रारंभ

"कामगार कल्याण केंद्राच्या वतीने कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी राबविण्यात येणारी प्रत्येक योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे त्यादृष्टीने कामकाज केले जात आहे तालुक्यातील सर्व कामगार पाल्याचे विविध योजनेचे अर्ज मंजूर झालेले असून त्यांच्या रक्कम बॅक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे."

- अनिल बोरसे, केंद्र प्रमुख, कामगार कल्याण केंद्र सिन्नर

Kamgar Kalyan Scholarship
Nashik News : अजितदादांच्या उपस्थितीत गुरुवारी शहा येथे शेतकरी मेळावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com