Nashik : गिरणा सहकारी बँकेच्या व्यवसायावर 6 महिने निर्बंध

RBI latest marathi news
RBI latest marathi newsesakal

नाशिक : बँकांची ढासळलेली आर्थिक परिस्थिती पाहता भारतीय रिझर्व बँकेने (RBI) मंगळवारी (ता.१९) नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेच्या (Girna Cooperative Bank) व्यवसायावर सहा महिन्यासाठी निर्बंध लादले आहेत.

मागील चार दिवसांमध्ये भारतीय रिझर्व बँकेकडून गिरणा सहकारी बँकेसह कर्नाटक येथील मल्लिकार्जुन पाटणा सहकारी बँक, यासह मुंबई येथील रायगड सहकारी बँक आणि द सिटी को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या व्यवसायावर निर्बंध लावले आहेत. (6 months restriction on business of Girna Cooperative Bank from RBI Nashik Latest marathi news)

RBI latest marathi news
Nashik : खड्ड्यांवरून शिवसेना आक्रमक; आयुक्तांना निवेदन

नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेची मागील काही काळापासून आर्थिक स्थिती पाहता रिझर्व बँकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेची सध्याची रोख स्थिती पाहता, सर्व बचत बँक किंवा चालू खाती किंवा ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण

शिल्लक रकमेतून खातेदार यांना पैसे काढण्याची परवानगी नसेल. परंतु ठेवी विमा आणि पत हमी महामंडळ (DICGC) विमा योजनेंतर्गत बँकेचे ९९.८७ टक्के ठेवीदार यांच्या ठेवी संरक्षित राहतील.

भारतीय रिझर्व बँकेने घालून दिलेल्या निर्बंधामुळे बँक रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा कर्जाचे नूतनीकरण बँकेस करता येत नाही. तसेच त्यांना कोणतीही गुंतवणूकही करण्यास मान्यता मिळणार नाही. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँकेचे कामकाज निर्बंधांसह नियमित सुरू राहील.

RBI latest marathi news
गढीच्या डागडुजीसाठी आदित्य ठाकरे नाशिकच्या मैदानात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com